अमेरिकेच्या नौदलाने चीनच्या DeepSeek अ‍ॅपवर घातली बंदी, ईमेल पाठवून कर्मचाऱ्यांना दिली ताकीद

अमेरिकेच्या नौदलाने चीनच्या DeepSeek अ‍ॅपवर घातली बंदी, ईमेल पाठवून कर्मचाऱ्यांना दिली ताकीद

DeepSeek हे चीनचे नवीन AI मॉडेल सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनले आहे. या अॅपने ChatGPT, Gemini आणि Claude AI लाही मागे टाकले आहे. मात्र, त्याच्या वाढत्या लोकप्रियेते बरोबरच सुरक्षा आणि नैतिकतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच अमेरिकेच्या नौदलाने आपल्या सदस्यांना सतर्क करत DeepSeek चा वापर न करण्याची ताकीद दिली आहे.

अमेरिकेच्या नौदलाने आपल्या कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवून DeepSeek AI च्या वापरावर बंदी घातली आहे. नौदलाने हे मॉडेल सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकादायक असू शकते. त्यामुळे हे अॅप डाऊनलोड न करण्याची ताकीद दिली आहे. DeepSeek हे एक ओपन सोर्स AI मॉडेल आहे जे कोणीही इन्सटॉल करु शकतं. त्यामुळे त्याबाबत सतर्कता राखायला सांगितली आहे.

DeepSeek AI मॉडेल फक्त 6 मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 50 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आले आहे. अमेरीकेच्या नौदलाच्या ईमेलमध्ये डीपसीकबद्दल गंभीर इशारा देण्यात आला आहे. ईमेलमध्ये म्हटले आहे की, ‘नवीन AI मॉडेल DeepSeek शी संबंधित एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, कोणत्याही कर्मचाऱ्याने हे AI मॉडेल वापरू नये, मग ते कामाशी संदर्भात असो किंवा वैयक्तिक वापरासाठी असो अशी ताकीद दिली आहे. अमेरिकेच्या नौदलाच्या या निर्णयाने स्पष्ट होते की, अमेरिका या चीनी एआय ॲपबद्दल सतर्क आहे आणि त्यांच्या सुरक्षा मानकांशी तडजोड करू इच्छित नाही.

DeepSeek ला अलिकडेच पहिली कायदेशीर नोटीस मिळाली आहे. Euroconsumers नावाच्या युरोपियन ग्राहक गटाने इटलीच्या डाटा प्रोटेक्शन एजन्सी (DPA) च्या सहकार्याने DeepSeek विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. युरोपियन एजन्सी डीपसीकच्या डाटा व्यवस्थापनाबद्दल चिंतित असून ते जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन (GDPR) चे उल्लंघन मानतात. इटलीच्या डेटा प्रोटेक्शन एजन्सीने (DPA) DeepSeek ला पत्र पाठवले आहे आणि 20 दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;