सलमान खानच्या बहिणीचा भीषण अपघात, फोटो पाहून धक्का बसेल

सलमान खानच्या बहिणीचा भीषण अपघात, फोटो पाहून धक्का बसेल

बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खानची मानलेली बहिण श्वेता रोहिरा हिचा भीषण अपघात झाला आहे, श्वेताने सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केले आहेत. फोटो पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

श्वेता रोहिराने आपल्या इन्सटाग्राम अकांउंटवर अपघाताचे दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत श्वेता रुग्णालयाच्या बेडवर झोपली असून तिच्या पायाला प्लास्टर दिसत आहे. हाताला सपोर्ट लावलेला असून ओठांवरही पट्टी लावलेली दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत श्वेताचा फाटलेला ओठ रक्तबंबाळ दिसत आहे.या फोटोंसोबत एक मोठी पोस्टही शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Rohira (@shwetarohira)

पोस्टमध्ये लिहीले आहे की, ‘आयुष्य सरप्राइजने भरलेले आहे, नाही का?’ एक क्षण, तुम्ही कल हो ना हो गुणगुणत आहात आणि तुमच्या दिवसाचे नियोजन करत आहात. पुढच्याच क्षणी, आयुष्य म्हणतं की माझा चहा पकडं मी तुझ्यासाठी बाईक पाठवली आहे. माझी कोणतीही चूक नसताना, मी चालण्याऐवजी उडत असल्याचे जाणवले, (दुर्दैवाने बॉलीवूड चित्रपटांसारखे स्लोमोशन नाही) आणि थेट सक्तीच्या विश्रांतीच्या स्थितीत गेले.

तिने पुढे लिहिले, ‘तुटलेली हाडे, जखमा आणि अंथरुणावर बरेच तास घालवणे, हे माझ्या कामाच्या यादीत नव्हते. पण कदाचित या ब्रम्हांडालाच वाटले असेल की मला संयमाचा धडा शिकवायची गरज आहे किंवा मला माझ्या स्वतःच्या मिनी-सोप ऑपेरामध्ये काम करायचे असेल, ज्यात हॉस्पिटलचा ट्विस्ट आला. वास्तव हे आहे की कधीकधी आयुष्य आपल्याला अशाप्रकारच्या घटनांमधून आणखी मजबूत करते.  मला माहित आहे की हा फक्त एक अध्याय आहे, संपूर्ण कहाणी नाही.’ असे म्हणत तिने भलीमोठी पोस्ट लिहीली आहे. तिच्या या  पोस्टवर युजर्सनी लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;