विराट कोहलीला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी, दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी; तीन जण जखमी

विराट कोहलीला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी, दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी; तीन जण जखमी

टीम इंडियाचा माजी कर्णधार 12 वर्षानंतर रणजी सामन्यात उतरला आहे. कोहली दिल्ली संघातून रेल्वेविरुद्धच्या सामना खेळत आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना सुरू आहे. यावेळी कोहलीला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी स्टेडियममध्ये एकच गर्दी केली. यामुळे स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली. यात तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळते.

गर्दीला नियंत्रित करताना एक सुरक्षारक्षकही जखमी झाला आहे. जखमींवर डीडीसीए सुरक्षा आणि पोलिसांनी तात्काळ प्रथमोपचार केले.

विराट कोहलीला पाहण्यासाठी चाहत्यांनी पहाटेपासूनच स्टेडियमबाहेर रांगा लावल्या होत्या. स्टेडियमबाहेर मोठी गर्दी झाली आणि आत घुसण्यासाठी गेट क्रमांक 16 बाहेर चाहत्यांमध्ये धक्काबुक्की झाली. यात काही जण जखमी झाले. यावेळी अनेक दुचाकींचेही नुकसान झाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;