Mahakumbh 2025 – 27 वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता नवरा, महाकुंभ मेळ्यात अघोरी रुपात आला समोर

Mahakumbh 2025 – 27 वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता नवरा, महाकुंभ मेळ्यात अघोरी रुपात आला समोर

महाकुंभ मेळ्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. 27 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली व्यक्ती झारखंडच्या एका कुटुंबाला प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात सापडली. शिवाय शरीरावर काही खुणा पाहिल्यावर कुटुंबाने तो त्यांच्या कुटुंबातील सदस्य असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सर्वच चकीत झाले आहे.

कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, गंगासागर यादव असे त्या व्यक्तीचे नाव असून तो 1998 मध्ये पाटणा येथून बेपत्ता झाला होता. आता तो अघोरी साधू बनला असून त्याची बाबा राजकुमार (65) अशी ओळख आहे.  गंगासागर 1998 मध्ये पाटणा येथून अचानक बेपत्ता झाला होता. बराच शोध घेऊनही तो कोणालाच सापडला नाही. त्याची पत्नी धनवा देवी यांनी एकटीनेच कमलेश आणि विमलेश या दोन मुलांचा सांभाळ केला. तर गंगाधर यांचा लहान भाऊ मुरली यादव म्हणाला की, गंगासागर यांना आम्ही इतके शोधले की आता तो सापडण्याची आशाच सोडून दिली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच आमच्या एका नातेवाईकाने महाकुंभ मेळ्यात एका साधूला पाहिले जो हुबेहुब गंगासागर सारखा दिसत होता. एवढेच नाही तर त्याने त्या साधूचा फोटोही काढून आणला. फोटो पाहून आम्हालाही आमच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही आणि आम्ही तत्काळ धनवा देवी आणि तिच्या दोन्ही मुलांसह कुंभ मेळ्यात पोहोचलो.

कुटुंबाने महाकुंभमेळ्यात पोहोचून तो साधू गंगासागरच असल्याचा दावा केला, मात्र त्या साधूने तो गंगासागर नसल्याचा दावा केला. ते बाबा राजकुमार असून ते वाराणसीचे साधू असल्याचे सांगत त्यांचा गंगासागरशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. त्यांच्यासोबत असलेल्या साध्वीनेही त्यांचे समर्थन केले. मात्र, कुटुंबाने त्यांच्या शरीरावर असलेल्या काही खुणा सांगत ते गंगासागर असल्याचा दावा केला. त्यांनी त्यांचे मोठे दात, कपाळावर खूण, गुडघ्यावर असलेली जुनी जखम दाखवत ही व्यक्ती गंगासागर असल्याचे सांगितले. आता यादव कुटुंबाने कुंभमेळ्यातील पोलिसांकडे याबाबत मदत मागितली आहे. शिवाय त्या व्यक्तीची खरी ओळख पटविण्यासाठी डिएनए टेस्टची मागणीही केली आहे.

गंगासागर यादव यांचा भाऊ मुरली यादव याने सांगितले की, आम्ही कुंभमेळा संपेपर्यंत वाट पाहू. गरज भासल्यास डिएनए चाचणी करून सत्य समोर आणू. चाचणीत आमचा दावा खोटा निघाला तर आम्ही माफी मागू. पण सध्या कुटुंबातील काही सदस्य घरी परतले असून काही कुंभमेळ्यातच आहेत आणि ते बाबा राजकुमार यांच्यावर नजर ठेवून आहेत. गंगासागर बेपत्ता झाल्यानंतर त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले होते. त्यावेळी त्यांचा मोठा मुलगा फक्त दोन वर्षांचा होता. आता सर्वांचेच लक्ष डीएनए टेस्टकडे आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;