समोर विमान दिसतेय का? 30 सेकंदापूर्वी हेलिकॉप्टरमध्ये कंट्रोलरचा संदेश, रिप्लाय येण्यापूर्वीच झाली भीषण दुर्घटना

समोर विमान दिसतेय का? 30 सेकंदापूर्वी हेलिकॉप्टरमध्ये कंट्रोलरचा संदेश, रिप्लाय येण्यापूर्वीच झाली भीषण दुर्घटना

अमेरिकेतील प्रवासी विमान आणि आर्मीच्या हेलिकॉप्टरची टक्कर होण्याच्या 30 सेकंद आधी कंट्रोलरने हेलिकॉप्टरमध्ये संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला होता. पण अवघ्या 30 सेकंदात विमान धडकले आणि तो संदेश टक्कर टाळण्यात अपयशी ठरला.

‘तुमच्या दृष्टीक्षेपात विमान आलेय का?’ अशी विचारणा कंट्रोलरने हेलिकॉप्टरमधील अमेरिकन सैनिकांना केली होती. त्यानंतर काही क्षणांत कंट्रोलरने आणखी एक रेडिओ कॉल केला. त्यात ‘पीएटी 25 सीआरजेच्या मागून पुढे गेले आहे, असे म्हटले आहे. मात्र त्यावेळी कुठल्याही उड्डाण ट्रॅकिंग साइटवरुन लष्कराच्या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरमधून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. नंतर अवघ्या काही क्षणांत प्रवासी विमान आणि लष्कराच्या हेलिकॉप्टरमध्ये जोरदार धडक झाली.

बुधवारी संध्याकाळी पोटोमॅक नदीवरील हवाई क्षेत्रात हा अपघात झाला. विमानात एकूण 60 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते, तर आर्मीच्या ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरमध्ये तीन अमेरिकन सैन्य सैनिक होते. या दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू झाला तर चौघांना वाचवण्यात यश आले आहे. बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;