माझी सर्व पापं धुतली गेली, महाकुंभ मेळ्यात गंगास्नान केल्यानंतर पूनम पांडे चर्चेत

माझी सर्व पापं धुतली गेली, महाकुंभ मेळ्यात गंगास्नान केल्यानंतर पूनम पांडे चर्चेत

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात आत्तापर्यत अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली. अशातच बोल्ड आणि वादग्रस्त अभिनेत्री पूनम पांडे देखील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात पोहोचली आहे. पूनमने मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र संगमात स्नान केलं. संगम घाटावर गंगेत डुबकी मारतानाचे काही फोटोही पूनमने शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

महाकुंभात स्नान केल्यानंतर पूनम पांडेने सोशल मीडियावर अनेक फोटो व्हिडीओ शेअर केलेत. हे फोटो शेअर करताना पूनमने ‘माझी सर्व पापं धुऊन गेली आहेत’, असे कॅपशन दिले आहे. पूनम पांडेच्या या फोटोंवर मजेदार कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. नेहमी बोल्ड स्टायलिश अवतारात असणाऱ्या पूनम पांडेला अध्यात्मिक अवतारात पाहून चाहते देखील अवाक झाले आहेत.

माझी सर्व पापे धुऊन गेली', महाकुंभात स्नान केल्यानंतर पूनम पांडे म्हणाली, चेंगराचेंगरीनंतर म्हणाली ही मोठी गोष्ट

अनेक कलाकारांची महाकुंभात हजेरी

आत्तापर्यत अनेक कलाकारांनी महाकुंभला हजेरी लावली. मात्र, लक्ष वेधलं ते अभिनेत्री ममता कुलकर्णीने. 90 च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून नावाजल्या जाणाऱ्या ममता कुलकर्णीने महाकुंभमेळ्यात येऊन संन्यास घेतला आणि किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर बनली. याशिवाय प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर हे देखिल प्रयागराजला पोहोचले. याशिवाय, रेमो डिसूझा, गुरु रंधावा, सपना चौधरी आणि अदा शर्मा सारखे स्टार देखील संगममध्ये डुबकी मारताना दिसले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;