भाजपने हिंदुत्वाचा बाजार मांडला , कर्जतच्या शिवसेना मेळाव्यात अंबादास दानवे यांची टीका

भाजपने हिंदुत्वाचा बाजार मांडला , कर्जतच्या शिवसेना मेळाव्यात अंबादास दानवे यांची टीका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा प्रत्येक शिवसैनिक हिंदुत्वाचा रक्षणकर्ता आहे. शिवसैनिक हिंदुत्व जपणारा आहे. आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. याउलट भाजपनेच हिंदुत्वाचा बाजार मांडल्याची जळजळीत टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते- शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केली. कर्जत येथील संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

कर्जत येथील शिवालय कार्यालयात शिवसैनिकांसाठी संवाद मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, पराभवाने खचून न जाता पुन्हा कामाला लागा. शिवसैनिक हा संघर्षातून पुढे आलेला आहे. त्यामुळे जय पराजयापेक्षा लोकहिताची कामे आम्ही करतच राहू. आपल्याला भाजपसारखी बोगस मतदार नोंदणी करायची नाही. भाजप खोटारडी पार्टी आहे. आमचे हिंदुत्व प्रामाणिक आहे. गद्दार लोकांना फक्त आर्थिक गोष्टीत रस असतो असे म्हणत त्यांनी मिंधेंवरही निशाणा साधला.

एसटी तिकीट दरवाढ मागे घेण्यासाठी सरकारला भाग पाडू आणि सामान्य जनतेला न्याय देऊ असा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, रायगड उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, महिला जिल्हा संघटक सुवर्णा जोशी, कर्जत तालुकाध्यक्ष उत्तम कोळंबे, खालापूर तालुका अध्यक्ष एकनाथ पिंगळे, बाबू घारे, भीमसेन बडेकर उपस्थित होते.

आमदार होऊनही मिंधेंच्या गावात सुतक

मिंधे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर अंबादास दानवे यांनी निशाणा साधला. गद्दार निवडून आले, परंतु गावात सुतक पडल्यासारखे वातावरण आहे. त्यांना साधी मिरवणूक काढता आलेली नाही की कोणी त्यांची ओवाळणी केली नाही असे म्हणत थोरवे यांचा दानवे यांनी समाचार घेतला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;