ठाणे जिल्ह्यातील बेकायदा शाळांना टाळे ठोका ! पालकमंत्र्यांचे आदेश

ठाणे जिल्ह्यातील बेकायदा शाळांना टाळे ठोका ! पालकमंत्र्यांचे आदेश

सामना प्रभाव

वारंवार नोटिसा बजावूनदेखील ठाणे जिल्ह्यात बेकायदा शाळांचा सपाटा सुरूच आहे. एकट्या ठाणे शहरात तब्बल 81 अनधिकृत शाळा असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येताच सरकार खडबडून जागे झाले आहे. जिल्ह्यातील सर्व बेकायदा शाळांना परीक्षेनंतर कायमचे टाळे ठोका असे आदेश पालकमंत्र्यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना नियोजन समितीच्या बैठकीत दिले. त्यामुळे संस्थाचालक व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात 81 बेकायदा शाळा असल्याची बातमी दैनिक ‘सामना’मध्ये आज प्रसिद्ध झाली होती. त्याची गंभीर दखल घेत ठाणे जिल्ह्यातील सर्वच अनधिकृत शाळा आता प्रशासनाच्या रडारवर आल्या आहेत. आज झालेल्या डीपीडीसीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी बेकायदा शाळांचा मुद्दा महत्त्वाचा असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. जिल्ह्यात सर्वाधिक बेकायदा शाळा या एकट्या ठाणे शहरात असून त्यावर वेळीच कारवाई केली नाही तर हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे काही सदस्यांनी स्पष्ट केले.

प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वार्षिक परीक्षा झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व अनधिकृत शाळा कायमच्या बंद कराव्यात असे आदेश दिले. तसेच या शाळा चालवणाऱ्या संचालकांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करून त्यांच्यावर थेट कारवाई करण्यासही सांगितले. नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील बेकायदा शाळांच्या प्रश्नावर चर्चा होत असतानाच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, पण विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन बेकायदा शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले.

15 दिवसांत कारवाई करणार

बेकायदा शाळा चालवणाऱ्या संस्थाचालकांवर जोपर्यंत कठोर कारवाई होणार नाही तोपर्यंत हे प्रकार सुरूच राहणार असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले, तर यातील काही शाळांना परवानगी देण्यास शासनाकडूनच टाळाटाळ होत असून शिक्षण विभागाने नियमात असलेल्या शाळांना तत्काळ परवानगी देण्याची मागणी आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली, तर पुढील पंधरा दिवसांत अनधिकृत शाळांना कायमचे सील ठोकणार असल्याची माहिती ठाणे पालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;