कामावर गेलेले धनंजय कोकाटे घरी परतलेच नाही

कामावर गेलेले धनंजय कोकाटे घरी परतलेच नाही

कामावर जातो असे सांगून घरातून बाहेर पडलेले धनंजय कोकाटे (54) हे रात्री उशिरापर्यंत घरी परतलेच नाही. त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांनी रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत ते बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असून कोणाला माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन रामनगर पोलिसांनी केले आहे.

धनंजय कोकाटे यांचे पूर्वी औषधांचे दुकान होते. ते खासगी ठिकाणी ते नोकरी करत होते. 15 जानेवारीला नोकरीवर जातो असे सांगून ते घरातून बाहेर निघाले. मात्र ते अद्याप घरी परतले नाहीत. याप्रकरणी कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी कोकाटे यांचा शोध सुरू केला असून कोकाटे यांच्याबाबत कोणाला माहिती असल्यास 9860034700 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डोंबिवली पोलिसांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;