पैशांच्या लोभापायी नराधम आई-बापाने पोटच्या गोळ्याला विकले , उल्हासनगरात माणुसकीला काळिमा

पैशांच्या लोभापायी नराधम आई-बापाने पोटच्या गोळ्याला विकले , उल्हासनगरात माणुसकीला काळिमा

पैशांच्या लोभापायी नराधम आई-बापाने पोटच्या गोळ्याला 90 हजार रुपयांत विकल्याचे उल्हासनगरमध्ये समोर आले आहे. बाळंतपणानंतर आपल्या नवजात नातीला पाहायला गेलेल्या आजीने याप्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेत मुलगा व सुनेविरुद्ध तक्रार दाखल केली. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या य घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच विकण्यात आलेल्या नवजात बालिकेला ताब्यात घेत बाळ संरक्षण व संगोपन केंद्राकडे सोपवण्यात आले आहे.

विजया गायकवाड यांना दोन मुले असून विशाल हा मोठा मुलगा बदलापुरात राहतो. 22 जानेवारी रोजी विशालच्या पत्नीने शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळंतपणाची माहिती मिळताच विशालची आई आपल्या नातीला पाहण्यासाठी रुग्णालयात गेल्या. त्यावेळी पैशांच्या लोभापायी विशाल व त्याच्या पत्नीने आपल्या पोटच्या गोळ्याला शेख नावाच्या मुस्लिम दाम्पत्याला 90 हजार रुपयांत विकल्याची माहिती विजया गायकवाड यांना मिळाली. त्यानंतर विजया गायकवाड यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर विशाल, पत्नी सुजाता, मध्यस्थ महिला गुडिया वर्मा, जुई पांडे, चिमुकलीची खरेदी करणारे नुरजहाँ शेख, गुलाम शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत पुरुष आरोपींना अटक केली आहे. तसेच महिलांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;