कॅसल मिल, गोकुळनगरवासीयांना मिळणार पाइप गॅस, शिवसेनेच्या पाठपुराव्यास यश

कॅसल मिल, गोकुळनगरवासीयांना मिळणार पाइप गॅस, शिवसेनेच्या पाठपुराव्यास यश

सिलिंडर बुकिंग, वेटिंग लिस्ट या सर्व कटकटीतून आता ठाण्यातील गृहिणींना दिलासा मिळाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पाठपुराव्यामुळे गोकुळनगर, कॅसल मिल भागातील रहिवाशांच्या घरात थेट पाइप गॅसची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे एका क्लिकवर गृहिणींना गॅस मिळणार असून त्याचे दरही कमी लागणार आहेत. आज शिवसेना नेते तथा माजी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते या पाइप गॅसचे लोकार्पण करण्यात आले.

कॅसल मिल परिसरातील आझाद नगर नं. 1, गोकुळनगरमधील साई आनंद प्लाझा, एकता साफल्य व इतर इमारतींमध्ये महानगर गॅसचा पुरवठा करण्यासाठी विभागप्रमुख राजू मोरे यांनी शिवसेना नेते राजन विचारे मार्गदर्शनाखाली महानगर गॅसकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून आजपासून महानगर गॅसचा पुरवठा या परिसरात सुरू झाला आहे. येत्या काही दिवसात परिसरातील इतर इमारतींमध्येही ही पाइप गॅस सुविधा लवकरात लवकर पोहोचणार असल्याचे आश्वासनही यावेळी शिवसेनेने दिले आहे.

शिवसेना नेते तथा माजी खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या उद्घाटन कार्यक्रमावेळी विभागप्रमुख राजू मोरे, उपविभागप्रमुख सुभाष उरणकर, वैभव झापकार, महिला आघाडी नंदा कोथळे, राजेश्री सुर्वे, कविता नार्वेकर, शाखाप्रमुख प्रकाश मोरे, योगेश वेंगुर्लेकर, दीपक मोरे, उपशाखाप्रमुख सतीश धनावडे, महेश मोरे, फोरीज तांबोळी, रोहित यादव, प्रेम यादव, दीपक केवट, ऋषिकेश निवाते, ओमकार मोरे, बाबू यादव, फुंडकर आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;