स्वामी समर्थांचं अलौकिक गणेशरुप; ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत माघी गणेशजयंतीनिमित्त खास एपिसोड
कलर्स मराठी वाहिनीवरील 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेमध्ये माघी गणेशजयंतीला स्वामींचं अलौकिक गणेशरुप दर्शन पहायला मिळणार आहे. यंदाचा माघी गणेशोत्सव स्वामी भक्तांसाठी अलौकिक पर्वणी ठरणार आहे. स्वामींचं अलौकिक असं प्रत्यक्ष गणेशरुप दर्शन घराघरात घडणार आहे.
अक्कलकोटातल्या एका अत्यंत विपन्न अवस्थेत असलेल्या घरात स्वामी प्रवेश करतात आणि घोषित करतात की यंदा माघी गणेशोत्सव दणक्यात साजरा करायचा.
आधीच गरीबीत असलेल्या दोन मुलांचा कसाबसा सांभाळ करणाऱ्या त्या कुटुंबाचा प्रमुख गयावया करतो, "स्वामी हे कसे शक्य आहे, आमचं हातातोंडावर पोट आहे. आम्ही याआधी गणपती कधीच घरी आणला नाही."
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List