Trump यांचे फेसबुक खाते निलंबनप्रकरणी मेटाला भूर्दंड; 25 दशलक्ष डॉलर्स भरावे लागणार

Trump यांचे फेसबुक खाते निलंबनप्रकरणी मेटाला भूर्दंड; 25 दशलक्ष डॉलर्स भरावे लागणार

फेसबुक खाते निलंबित केल्याप्रकरणी तडजोड करण्यासाठी मेटाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 25 दशलक्ष डॉलर्स देण्याचे मान्य केले आहे. मेटा ही फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मूळ कंपनी आहे. हा निकाल ट्रम्प यांचा विजय मानला जात आहे.

काय आहे प्रकरण?

अमेरिकेत 3 नोव्हेंबर 2020 रोजी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव करून बायडेन यांनी विजय मिळवला होता. यानंतर ट्रम्प यांच्या समर्थकांनी निवडणुकीत हेराफेरी केल्याचा आरोप केला होता. यानंतर 6 जानेवारी 2021 रोजी ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसदेत घुसून तोडफोड केली. या हिंसाचारात एका पोलीस अधिकाऱ्यासह 5 जणांचा मृत्यू झाला होता. हिंसाचारानंतर ट्रम्प यांच्यावर समर्थकांना भडकावण्याचा आरोप करत त्यांचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट निलंबित करण्यात आले होते.

ट्रम्प यांनी फेसबुक आणि इंस्टाग्रामने चुकीच्या पद्धतीने सेन्सॉर केल्याचा दावा करत मेटा आणि त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांच्याविरुद्ध खटला दाखल केला होता. हा खटला मिटवण्यासाठी मेटाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 25 दशलक्ष डॉलर्स देण्याचे मान्य केले आहे, असे कंपनीने सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;