Washington DC: जेट विमानाची लष्कराच्या हेलिकॉप्टरला धडक, राजधानीतील विमान वाहतूक काही काळासाठी थांबवली

Washington DC: जेट विमानाची लष्कराच्या हेलिकॉप्टरला धडक, राजधानीतील विमान वाहतूक काही काळासाठी थांबवली

अमेरिकेतील रोनाल्ड रेगन वॉशिंग्टन राष्ट्रीय विमानतळाजवळील पोटोमॅक नदीत एक प्रवासी जेटची लष्करी हेलिकॉप्टरशी धडक झाल्याचे वृत्त आहे. एएफपीने व्हाईट हाऊसच्या हवाल्याने या घटनेची माहिती दिली आहे.

व्हाइट हाऊसच्या म्हणण्यानुसार, बुधवारी रात्री व्हर्जिनियातील आर्लिंग्टन येथील रेगन राष्ट्रीय विमानतळावरील सर्व उड्डाणे थांबवण्यात आली. एका लष्करी ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरची एका प्रादेशिक जेटशी टक्कर झाल्यानंतर ही उड्डाणे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या घटनेनंतर व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी सांगितलं की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परिस्थितीची माहिती घेतली आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, ‘दुर्दैवाने असे दिसते की एका लष्करी हेलिकॉप्टरची एका खासगी जेटशी टक्कर झाली’.

वॉशिंग्टन अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, बचाव कार्य सुरू असून अनेक अग्निशमन नौका घटनास्थळी उपस्थित आहे.

काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, विमानतळाजवळ अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइट 5342 आणि ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरमध्ये टक्कर झाली.

सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये रेगन विमानतळावर लँडिंग दरम्यान विमान हेलिकॉप्टरला धडकल्याचे दृष्य व्हायरल झाले आहे.

डीसी फायर अँड ईएमएसने सोशल मीडियावरील निवेदनात घटनेची पुष्टी केली असून, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;