भयंकर! मुलांसमोर आईवर बलात्कार, मग अ‍ॅसिड फेकून आरोपी फरार

भयंकर! मुलांसमोर आईवर बलात्कार, मग अ‍ॅसिड फेकून आरोपी फरार

आसाममधील कचार जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधमाने शेजारी राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेवर तिच्या मुलांसमोर बलात्कार केला. यानंतर आरोपीने महिलेवर ॲसिड फेकून पळ काढला. कच्छर जिल्ह्यातील ढोलाई पोलीस स्टेशनला या घटनेबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपीचा शोध घेत असल्याचे समजते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी 28 वर्षीय ड्रायव्हर असून तो कुटुंबाचा शेजारी आहे. गेल्या बुधवारी 22 जानेवारी रोजी ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी अचानक महिलेच्या घरी घुसला. यावेळी महिला आणि तिची दोन मुलेच घरात होती. या मुलांसमोरच आरोपीने महिलेवर बलात्कार केला. यानंतर महिलेवर ॲसिड फेकून घटनास्थळावरून पळ काढला. काही वेळाने महिलेचा नवरा घरी आला तेव्हा महिला हातपाय बांधलेल्या अवस्थेत त्याला दिसली. यासंदर्भात महिलेच्या नवऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली.

दरम्यान, महिलेला सिलचर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना 22 जानेवारी रोजी घडली असून दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;