Mahakumbh 2025: एवढ्या मोठ्या कार्यक्रमात किरकोळ घटना घडत असतात! यूपीच्या मंत्र्याचं बेजबाबदार वक्तव्य

Mahakumbh 2025: एवढ्या मोठ्या कार्यक्रमात किरकोळ घटना घडत असतात! यूपीच्या मंत्र्याचं बेजबाबदार वक्तव्य

उत्तर प्रदेशचे मंत्री संजय निषाद यांनी बुधवारी महाकुंभ नगरातील चेंगराचेंगरीबद्दल दुःख व्यक्त केलं. मात्र त्यापुढे म्हटले की, ‘एवढ्या मोठ्या कार्यक्रमात “छोट्या घटना” घडत असतात’. त्यांच्या अशा विधानामुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. अशा प्रकारचं विधान म्हणजे बेजबाबदारपणा असल्याच्या प्रतिक्रिया लोकांकडून येत आहेत.

निषाद हे निषाद पक्षाचे प्रमुख आणि योगी आदित्यनाथ सरकारमधील मत्स्यव्यवसाय मंत्री आहेत.

‘एवढ्या मोठ्या कार्यक्रमात आणि जेव्हा एवढी मोठी गर्दी असते तेव्हा किरकोळ घटना घडतात’, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री आदित्यनाथ या प्रकरणाची चौकशी करत आहेत अशी माहिती त्यांनी दिली. तसंच जिथे जागा मिळेल तिथे स्नान करा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन त्यांनी भाविकांना केलं.

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी महाकुंभात गैरव्यवस्थापनाच्या आरोपा केले आहेत. त्याबद्दल विचारले असता निषाद यांनी त्यावर विधान करणं टाळलं.

‘ज्या व्यवस्था केल्या आहेत आणि तिथे असलेली गर्दी जगात कुठेही नसेल. जिथे एवढी मोठी व्यवस्था केली जाते आणि एवढी मोठी गर्दी जमते, तिथे काही लहान घटना कुठेतरी घडतात’, या मतावर ते ठाम होते.

‘ही घटना आमच्यासाठी दुःखद आहे आणि भविष्यात असं कधी घडू नये अशी माझी इच्छा आहे. आम्ही लोक आणि संपूर्ण सरकार अगदी सतर्क आहोत’, असं त्यांनी सांगितलं.

महाकुंभ नगरीत चेंगराचेंगरी झाली ज्यामध्ये 30 जणांचा मृत्यू झाला आणि 60 जण जखमी झाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;