पालघरमध्ये टायर कारखान्यात बॉयलरचा स्फोट, पाच जण गंभीर जखमी

पालघरमध्ये टायर कारखान्यात बॉयलरचा स्फोट, पाच जण गंभीर जखमी

वाडा तालुक्यातील वडवली गावात टायरच्या कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या दुर्घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन मुलांचा समावेश आहे. वाडा तहसील अंतर्गत कुडूस औद्योगिक क्षेत्रात ही घटना घडली.

तुफान कलसीम डामोर, रोशनी प्रविण परमार, मुला प्रेम वासर आणि काजल परमार(3) आणि आकाश प्रेम मासर (18 महिने) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना तात्काळ नजीकच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ठाणे येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले.

कारखान्यात दोन बॉयलरमध्ये तेलाची प्रोसेसिंग सुरू असताना अचानक दबाव वाढल्याने बॉयलरचा पाईप फाटला. यामुळे स्फोट झाला आणि आग लागली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, आपत्कालीन पथक आणि अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. पुढील तपास सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;