मोनालिसाचे हास्य अधिक सुरक्षित होणार; फ्रान्स सरकारची म्युझियम नूतनीकरणाची योजना

मोनालिसाचे हास्य अधिक सुरक्षित होणार; फ्रान्स सरकारची म्युझियम नूतनीकरणाची योजना

मोनालिसा म्हणजे एक आश्चर्य आहे. मोनालिसाचे रहस्यमय हास्य अनमोल आहे. लिओनार्दो दा विंचीची ‘मोनालिसा’ ही जगप्रसिद्ध कलाकृती सध्या फ्रान्सच्या पॅरिस येथील लोव्री म्युझियममध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेली आहे. तिची एक झलक बघण्यासाठी दरवर्षी लाखो लोक फ्रान्सला येत असतात. मोनालिसाचे हास्य सुरक्षित रहावे म्हणून फ्रान्सच्या सरकारने एक खास प्लॅन तयार केलाय. त्यामुळे कदाचित भविष्यात मोनालिसाच्या दर्शनासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील.

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन यांनी लोव्री म्युझियमचे नूतनीकरण करायचे ठरवले आहे. याअंतर्गत ‘मोनालिसा’साठी वेगळी केबिन तयार केली जाणार आहे. म्युझियमध्ये काही भूमिगत खोल्या तयार केल्या जाणार आहेत. तसेच शीन नदीच्या बाजूने प्रवेशद्वार केला जाईल. या प्लॅनसाठी हजार करोड युरो खर्च होतील, असा अंदाज आहे. तसेच काही वर्षे लागतील. लोव्री म्युझियमच्या वाईट अवस्थेबद्दल म्युझियमच्या संचालकांनीच चिंता व्यक्त केलेय. त्याची दखल घेत फ्रान्स सरकारने नूतनीकरणाची योजना आखलेय.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;