Mahakumbh 2025 – महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, 30 भाविकांचा मृत्यू; शंभरहून अधिक जखमी, मौनी अमावास्येला घात झाला

Mahakumbh 2025  – महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, 30 भाविकांचा मृत्यू; शंभरहून अधिक जखमी, मौनी अमावास्येला घात झाला

महाकुंभमेळ्यात मौनी अमावास्येच्या पर्वासाठी देशभरातून कोटय़वधी भाविक अमृतस्नानाकरिता दाखल झाले. भक्तीचा महापूरच या अद्भुत क्षणी संगम तटावर उसळला. मात्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची अख्खी यंत्रणा केवळ व्हीव्हीआयपींच्या सेवेत गर्क राहिली. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अमृतस्नानाचा ब्रह्ममुहूर्त साधण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली. यावेळी प्रचंड रेटारेटी, चेंगराचेंगरी होऊन 30 भाविकांचा मृत्यू झाला, तर शंभरहून अधिक भाविक जखमी झाले. मौनी अमावास्येला घात झाला आणि अमृतस्नान ‘मृत’स्नान ठरले. शेकडो भाविकांच्या आक्रोशाने गंगेच्या संगमाचा अक्षरशः थरकाप उडाला. जिकडेतिकडे विखुरलेल्या चपला, बूट, कपडे, इतर सामान आणि आप्त गमावलेल्या भाविकांचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, हंबरडा… असे भयाण चित्र होते.

पोलीस आयुक्त म्हणाले… भगदड मचने की संभावना है आणि…

गंगातटावर हजारो भाविक झोपले होते. तेव्हा ‘यहाँ लेटे रहनेसे कोई फायदा नही है. जो सोवत है, सो खोवत है. उठीये, उठीये स्नान करिए. ये आपके सुरक्षा के लिए कह रहे है. अभी बहुत सारे लोग आ रहे है. भगदड मचने की संभावना है. आप पहेले आ गए है तो सबसे पहले आपको अमृत मिलना चाहिए’ अशी उद्घोषणा पोलीस आयुक्त विजय पंत यांनी केल्यानंतर चेंगराचेंगरी झाल्याचे सांगितले जात आहे.

17 तास मौन

तब्बल 17 तासांनंतर मृत व जखमींचा आकडा जाहीर करण्यात आला. सायंकाळी 6.30 वाजता पोलीस उपमहानिरीक्षक वैभव कृष्णा आणि कुंभमेळा अधिकारी विजय किरण आनंद यांनी केवळ 3 मिनिटांची पत्रकार परिषद घेतली.

व्हीआयपी कल्चरला लगाम घाला

अत्यंत ढिसाळ व्यवस्थापन आहे. सामान्य भाविकांऐवजी सगळी यंत्रणा व्हीआयपींच्या दिमतीला ठेवली गेली आहे. त्यामुळेच ही भीषण दुर्घटना घडली. अजून महाकुंभमेळा बराच काळ चालणार आहे. आता तरी सरकारने व्यवस्था सुधारावी. व्हीआयपी कल्चरला लगाम घालावा. – राहुल गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;