मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्यास मी राजीनामा देईन; धनंजय मुंडेंनी ढकलला फडणवीस, अजितदादांच्या कोर्टात चेंडू

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्यास मी राजीनामा देईन; धनंजय मुंडेंनी ढकलला फडणवीस, अजितदादांच्या कोर्टात चेंडू

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व वाल्मीक कराड खंडणी प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे वादाच्या भोवऱयात सापडले आहेत. कराड यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना मी दोषी वाटत असेल तर मी राजीनामा देईन, असे सांगत राजीनाम्याचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोर्टात ढकलला आहे.

मी मंत्री असते तर राजीनामा दिला असता – सुप्रिया सुळे

नैतिकतेच्या मुद्दय़ावर धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत, यावरून राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, ‘आमच्या सरकारच्या काळात अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ यांना केवळ ऐकीव माहितीवर अटक केली होती. वर्ष-वर्ष ते तुरुंगात होते. आता तर सत्तेत असलेले आमदारही टीव्हीवर रोज पुरावे देत असतानाही राजीनामा दिला जात नाही. माझ्यामुळे जर 50 दिवस पक्षाची रोज बदनामी होत असती तर मी स्वतःहून राजीनामा दिला असता. मी पक्षाला अडचणीत आणणारी भूमिका घेतली नसती, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

कराड समर्थकांविरोधात गुन्हा

जातिवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी वाल्मीक कराड याच्या तिघा समर्थकांविरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीम आर्मीचे अशोक कांबळे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

देशमुख कुटुंब अजितदादांना भेटणार

सरपंच हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी 50 दिवसांनंतरही फरार आहे. आम्हाला न्याय द्या, या मागणीसाठी देशमुख पुटुंब पालकमंत्री अजित पवार यांना भेटणार आहे. दरम्यान, हत्येच्या आदल्या दिवशी हॉटेलच्या सीसीटीव्हीत सुदर्शन घुले, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि धनंजय देशमुख दिसत आहेत. यासंदर्भात बोलताना धनंजय देशमुख यांनी हॉटेलचे बिल आपणच दिल्याचे म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;