Govind Pansare Case – कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन

Govind Pansare Case – कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्ये प्रकरणातील सहा आरोपींना उच्च न्यायालयाने आज प्रत्येकी 25 हजारांचा सशर्त जामीन मंजूर केला. आरोपी सचिन अंदुरे, गणेश मिस्किन, अमित देगवेकर, अमित बड्डी, भरत कुरणे व वासुदेव सूर्यवंशी या आरोपींना न्या. अनिल किल्लोर यांच्या एकल पीठाने जामीन मंजूर केला. 2018-19 मध्ये या आरोपींना अटक झाली आहे. आरोपी विरेंद्र तावडेच्या जामीन अर्जावर स्वतंत्र सुनावणी घेतली जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

गोळ्या झाडून हत्या

16 फेब्रुवारी 2015 रोजी ही घटना घडली. पानसरे हे मार्ंनग वॉक करत असताना दोघे जण दुचाकीवरून आले व त्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. स्थानिक पोलीस, नंतर विशेष पथक व अखेर एटीएसकडे याचा तपास सोपवण्यात आला. जामिनासाठी या आरोपींनी स्वतंत्र याचिका केल्या होत्या. या याचिकांना कॉम्रेड पानसरे यांची सून स्मिता पानसरे यांनी विरोध केला. या आरोपींना जामीन मंजूर करू नये, अशी विनंती पोलिसांनी केली. ती न्यायालयाने मान्य केली नाही.

  • पुराव्यांशी छेडछाड करू नये, साक्षीदारांना धमकावू नये, खटल्याच्या प्रत्येक सुनावणीला हजर राहावे यासह अन्य अटी न्यायालयाने जामीन मंजूर करताना घातल्या आहेत.

खटला रेंगाळला

गेली पाच ते सहा वर्षे आरोपी कारागृहात आहेत. या खटल्यात एकूण 130 साक्षीदार आहेत. आतापर्यंत 30 साक्षीदारांची साक्ष नोंदवून झाली आहे. खटल्याची प्रगती समाधानकारक नाही. भविष्यात खटला कधी पूर्ण होईल याची शाश्वती नाही, असा ठपका न्यायालयाने जामीन मंजूर करताना ठेवला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;