‘वडापाव’वाले सारंग हरपले सुभाष सारंग यांचे निधन

‘वडापाव’वाले सारंग हरपले सुभाष सारंग यांचे निधन

प्रभादेवी येथील प्रसिद्ध ‘सारंग बंधू वडापाव’चे सर्वेसर्वा सुभाष सारंग यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी स्वप्ना, मुलगा सूरज, मुलगी धनश्री असा परिवार आहे.

कट्टर शिवसैनिक आणि मराठी उद्योजक अशी ओळख असलेले सुभाष सारंग हे मूळचे वेंगुर्ला तालुक्यातील पाटपरूळे गावचे. सुरुवातीच्या काळात त्यांनी मुंबईत मिल कामगार म्हणून काम केले. मराठी माणसाने नोकरीऐवजी उद्योगधंद्यात उतरावे या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी प्रभादेवी येथे सारंग बंधू या नावाने वडापावचा छोटासा स्टॉल सुरू केला. पुढे त्यांनी हॉटेल व्यवसायात चांगली प्रगती केली. दादरसह प्रभादेवी, वरळी परिसरात सारंग बंधू यांचा वडापाव आणि कांदा भजी म्हणजे खवय्यांचा जीव की प्राण. अनेक राजकीय नेतेदेखील आवर्जून त्यांच्या कांदा भजीचा आस्वाद घ्यायला येथे यायचे.

मध्य प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, प्रभादेवी पालिका शाळा पालक संघटनेचे अध्यक्ष, यंग प्रभादेवी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष म्हणूनदेखील त्यांनी काम पाहिले होते. दरम्यान, सुभाष सारंग यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवाचे देहदान करण्यात आले आहे. तत्पूर्वी आज सायंकाळी त्यांचे पार्थिव प्रभादेवी येथील त्यांच्या हॉटेलजवळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. शिवसेना विभागप्रमुख, आमदार महेश सावंत, शिवसेना उपनेत्या, माजी महापौर विशाखा राऊत, शाखाप्रमुख संजय भगत यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;