महत्त्वाचे – आयपीएस संजय सक्सेना यांना बढती

महत्त्वाचे – आयपीएस संजय सक्सेना यांना बढती

वरिष्ठ आयपीएस संजय सक्सेना यांना बढती देत त्यांच्या बदलीचे आदेश आज काढण्यात आले. सक्सेना यांच्याकडे आता रिक्त असलेल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संजय सक्सेना हे सध्या राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेचे अपर पोलीस महासंचालक म्हणून कारभार पाहत होते. आज संजय सक्सेना यांना बढती देत त्यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.

नोकरदार महिलांसाठी ताडदेवमध्ये वसतिगृह

नोकरी, कामधंद्याच्या निमित्ताने राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून अनेक महिला, तरुणी मुंबईत येतात. मुंबईसारख्या महागडय़ा शहरात या महिला, तरुणींना भाडय़ाने घर घेणे वा निवाऱयाची सोय करणे अडचणीचे ठरते. ही बाब लक्षात घेत नोकरदार महिलांसाठी मुंबईत ताडदेव येथे 23 मजली वसतिगृह उभारण्यात येणार आहे. म्हाडाकडून याबाबतचा प्रस्ताव आठवडाभरापूर्वी गृहनिर्माण विभागाकडे सादर करण्यात आला आहे. या वसतिगृहात नोकरदार, कष्टकरी 860 महिलांच्या निवाऱयाची व्यवस्था होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;