Jammu And Kashmir News: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या 25 तळांवर छापे, पोलिसांची मोठी कारवाई

Jammu And Kashmir News: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या 25 तळांवर छापे, पोलिसांची मोठी कारवाई

जम्मू-काश्मीर पोलिसांनी बुधवारी राजौरी जिल्ह्यात असलेल्या दहशतवाद्यांच्या 25 तळांवर छापे टाकले. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. याबाबत माहिती देताना पोलीस प्रवक्त्यांनी सांगितलं की, छापेमारी दरम्यान अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवानही सहभागी झाले होते.

पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही कारवाई त्या दहशतवाद्यांवर करण्यात आली जे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधून (पीओके) त्यांच्या कारवाया करत आहेत. या संशयित दहशतवाद्यांविरोधात यूएपीए UAPA) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी राजौरी, नौशेरा, थन्नामंडी, दारहल, कोटरंका, बुधल, मंजाकोट आणि चिंगास यासह 25 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाकडून मिळालेल्या वॉरंटच्या आधारे ही शोध मोहीम राबविण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;