Mahakumbh 2025 – ब्रह्ममुहुर्तावर अमृतस्नान करण्यासाठी भाविक थांबलेले त्याचवेळी… उपमहानिरिक्षकांनी सांगितला घडलेला प्रकार

Mahakumbh 2025 – ब्रह्ममुहुर्तावर अमृतस्नान करण्यासाठी भाविक थांबलेले त्याचवेळी… उपमहानिरिक्षकांनी सांगितला घडलेला प्रकार

प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात बुधवारी पहाटे मौनी अमावस्येच्या निमित्ताने अमृतस्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. भाविकांचे जत्थेच्या जत्थे त्रिवेणी संगमावर स्नानासाठी येत असतानाच रात्री दोनच्या सुमारास तिथे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू झाला तर 60 जण जखमी झाले आहेत.

महाकुंभचे पोलीस उप महानिरिक्षक वैभव कृष्णा यांनी पत्रकार परिषद घेत घडलेला प्रकार सांगितला. ”मौनी अमावस्येच्या निमित्ताने भाविक ब्रह्ममुहुर्तावर अमृतस्नान करण्याची वाट पाहत होते. बरेचसे भाविक आधीच त्या ठिकाणी उपस्थित होते व ब्रह्ममुहुर्ताची वाट पाहत होते. त्यावेळी अचानक भाविकांची एक मोठी गर्दी तिथे पोहोचली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला व चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू झाला आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या दुर्घटनेची न्यायालयीन आयोगाकडून चौकशी करण्यात येणार आहे. तसेच ही समिती निर्धारित वेळेत राज्य सरकारला आपला अहवाल सादर करेल, असेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;