पालिका शाळांची ICSE, CBSE ची पहिली फळी बोर्डाच्या परीक्षेला बसणार, आदित्य ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा

पालिका शाळांची ICSE, CBSE ची पहिली फळी बोर्डाच्या परीक्षेला बसणार, आदित्य ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा

Aaditya Thackeray on Mumbai public School Board Exam – पालिकेच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या महापालिकेच्या ICSE, CBSE बोर्डाच्या शाळांमधील पहिली फळी ही यंदा बोर्डाच्या परीक्षेला बसणार आहे. त्या विद्यार्थ्यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. ”आम्ही मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये ICSE आणि CBSE बोर्डसोबत IB आणि IGCSE बोर्डही सुरू केले, जेणेकरून मुंबईतील प्रत्येक मुलाला आणि मुलीला उत्तम शैक्षणिक संधी मिळेल. या विद्यार्थ्यांना परीक्षा देताना पाहण्यास मी उत्सुक आहे. आज मला खूप आनंद, अभिमान वाटतोय. BMC च्या मुंबई पब्लिक स्कूल्स या देशातील कोणत्याही महापालिकेच्या शाळांमधील एकमेव शाळा आहेत जिथे इतक्या विविध प्रकारच्या शैक्षणिक बोर्डांतर्फे शिक्षण दिले जाते. 2011 ते 2022 मधील सर्व शिक्षण समिती, NGO संस्था, शिक्षणतज्ज्ञ आणि बीएमसी अधिकारी यांच्या पाठिंब्याबद्दल मी सदैव कृतज्ञ आहे”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;