महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करू नये; अंबादास दानवेंनी घेतली अजित पवारांची भेट

महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करू नये; अंबादास दानवेंनी घेतली अजित पवारांची भेट

महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्यात येऊ नये, या मागणीसाठी बुधवारी लॉटरी विक्रेता सेना आणि लॉटरी बचाव कृती समितीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात शिवसेना लॉटरी विक्रेता सेना व लॉटरी बचाव कृती समितीची बैठक झाली. त्यावेळी महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली.

इतर राज्यात लॉटरी विक्री मोठया प्रमाणात सुरू आहे. आपल्या राज्यात पारदर्शकपणे सोडत होऊनही महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. लॉटरीवर लाखो कुटुंबांच उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे ती बंद पडू नये या प्रमुख यासाठी शिवसेना लॉटरी विक्रेता सेना व लॉटरी बचाव कृती समितीने पुढाकार घेतला आहे. याबाबत त्यांनी नुकतीच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. त्यानुसार बुधवारी अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेण्यात आली.

या बैठकीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना लॉटरी विक्रेता सेना व लॉटरी बचाव कृती समितीने महाराष्ट्र राज्य लॉटरीबाबतची सद्यस्थिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडली. त्यांनी ही सद्यस्थिती ऐकून या लॉटरी विक्रीवर लाखो मराठी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत येत्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेचे प्रमुख मार्गदर्शक व आमदार सुनील शिंदे, अध्यक्ष मनोज वारंग व लॉटरी बचाव कृती समिती सदस्य उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;