इंडस्ट्रीमध्ये साइड एक्टर्सना वाईट वागणूक दिली जाते, अभिनेत्रीचा धक्कादायक दावा

इंडस्ट्रीमध्ये साइड एक्टर्सना वाईट वागणूक दिली जाते, अभिनेत्रीचा धक्कादायक दावा

फातिमा सना शेखने 2002 मध्ये तिचा टीव्हीवरचा प्रवास सुरू केला. ती ‘किट्टी पार्टी’ मध्ये दिसली होती. यानंतर तिने ‘लेडीज स्पेशल’, ‘अगले जनम मोहे बिटिया ही किजो’ सारखे शो देखील केले आहेत.फातिमाने अनेक चित्रपटांमध्येही काम केले. पण तिला दंगल चित्रपटातून प्रसिद्धि मिळाली.

दंगल फेम अभिनेत्री फातिमा शेखने इंडस्ट्रीबद्दल धक्कादायक दावा केला आहे. फातिमा सना शेखने एका मुलाखतीत सांगितलं की, टीव्ही इंडस्ट्रीमध्ये साइड एक्टर्सना वाईट वागणूक दिली जाते. अपमान केला जातो आणि त्यांच्यासोबत चुकीचं वागलं जातं. बॉलीवुड बबलशी केलेल्या संवादात फातिमाला टीव्हिवर काम करत असताना होत असलेल्या त्रासा बद्दल विचारले तेव्हा फातिमाने सांगितले की, तुम्ही जर मुख्य कलाकार नसाल तर टीव्ही शोमधील छोट्या भूमिका असलेल्या साइड कॅरेक्टरना आदर इंडस्ट्रीमध्ये मिळत नाही. टीव्हीचं शूट सुरू झाल्यानंतर, 3 किंवा 4 महिन्यांनी पैसे मिळतात. दररोज सेटवर जाऊन हजेरी लावावी लागते आणि मी आली आहे हे त्यांना सांगावं लागतं आणि तुम्हाला सही करावी लागते. जर तुम्ही सेटवर गेला असाल पण अटेंडन्स रजिस्टरमध्ये सही करायला विसरलात तर प्रॉडक्शनचे लोक ते स्वीकार करत नाही. जेव्हा मी साइड एक्टर म्हणून काम करायचे तेव्हा मला दिवसाला 1000 किंवा 1500 रुपये मिळायचे, जे तेव्हा खूप होते. पण अटेंडन्स नसेल तर ते पैसे कापले जायचे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;