MahaKumbh 2025 – मरता मरता वाचलो, आम्ही महाराष्ट्रातून आलोय, पैसे गेले, कपडे गेले; चेंगराचेंगरीतून वाचलेल्या कुटुंबाचा थरकाप उडवणारा आक्रोश

MahaKumbh 2025 – मरता मरता वाचलो, आम्ही महाराष्ट्रातून आलोय, पैसे गेले, कपडे गेले; चेंगराचेंगरीतून वाचलेल्या कुटुंबाचा थरकाप उडवणारा आक्रोश

उत्तर प्रदेशात प्रयागराजमधल्या महाकुंभ मेळ्यात आज पहाटेच्या सुमारास भीषण घटना घडली. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ बघितल्यावर थरकाप उडेल. ही घटना एवढी भीषण होती यात 10 भाविकांचा मृत्यू झाला तर, शेकडो भाविक जखमी झाले. सर्वत्र आरडाओरड, महिलांच्या किंकाळ्या आणि मदतीसाठी सगळीकडे टाहो फोडत होते. कपडे, चपला आणि साहित्य ठिकठिकाणी अस्ताव्यस्त पडल्याचे भीषण दृश्य होते. चेंगराचेंगरीच्या घटनेवेळी प्रशासनाचे कुठेही नियंत्रण दिसले नाही. एवढेच नाही तर घटेनंतर मदतीसाठी याचना करणाऱ्या भाविकांच्या मदतीलाही प्रशासन आले नाही. भाविक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर संताप व्यक्त करत होते, आक्रोश करत होते.

चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर संगम घाटाजवळ अतिशय भीषण दृश्य होते. कित्येक भाविक बेशुद्ध अवस्थेत जमीनवर पडलेले होते. ठिकठिकाणी कपडे आणि चपला पडलेल्या होत्या. अनेक भाविकांचे पैसे, मोबाईल हरवले. बघावं तिकडे एकच गोंधळ होता. काही भाविक मदत करा… मदत करा म्हणत होते. तर काहीजण आई-वडील, बहीण-भाऊ, नातलगांपासून दूर झाले. कोण कुठे आहे, कुणाचाही पत्ता लागेना. काही भाविकांना भीतीने रडू कोसळलं. इतकी ही भयंकर आणि भीषण घटना असल्याचे त्यातून वाचलेल्या भाविकांनी सांगितले.

प्रयागराजमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील काही भाविकांनी आपल्यावर बेतलेली भयंकर घटना सांगितली. त्यांचा हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. चेंगराचेंगरी झाली. पण यावेळी अर्धातास पोलीस नव्हते. मरता मरता लोक वाचलेत. आम्ही महाराष्ट्रातून आलोय. आमचे पैसे गेले, कपडे गेल. आता घरी कसं जाऊ? माझ्या आईच्या अंगावरील कपडे गेले. पण मदतीला न आलेले पोलीस नंतर म्हणतात आम्हालाच बोलत होते, असे महाराष्ट्रातील एका कुटुंबाने सांगितले.

दोनशे लोक चेंगराचेंगरीत होते. माझी पत्नी गर्दी दबली गेली. अशी असते का व्यवस्था? असा सवाल चेंगराचेंगरीतून वाचलेल्या मराठी कुटुंबातील व्यक्तीने केला. इथे कुठेही प्रशासन नाहीये. मेले तर मेले भाविक, अशी स्थिती असल्याचा संताप भाविकांनी व्यक्त केला. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर अनेक लोक आपला मोबाईल, पैसे आणि कपडे अस्ताव्यस्थ पडलेल्या ढिगाऱ्यांमध्ये शोधत होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;