कराचा बोझा मुंबईकरांवर आणि जमिनी अदानीला, हा भाजपचा कुठला न्याय, आदित्य ठाकरे यांची टीका

कराचा बोझा मुंबईकरांवर आणि जमिनी अदानीला, हा भाजपचा कुठला न्याय, आदित्य ठाकरे यांची टीका

देवनार येथील डंम्पिंग ग्राऊंडची जागा अदानीला देण्याआधी त्या प्लॉटवर प्रक्रीया करून तो स्वच्छ करून अदानीला द्या, असे आदेश राज्य सरकारने महापालिकेला दिले आहे. त्यासाठी आता दोन अडीच हजार रुपयांचे टेंडर काढले जाणार आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला फटकारले आहे.

”काही महिन्यांपूर्वी देवनारचे डंपिंग ग्राऊंड राज्य सरकारने धारावी पुर्नविकासाला दिलं होतं. कचऱ्याच्य ढिगाऱ्यावर धारावीतील लोकांना नेऊन ठेवणार होते. त्याला महापालिकेने विरोध केला होता. विरोध करणारच डंम्पिंग ग्राऊंड नसेल तर शहराचा कचरा कुठे टाकणार. मात्र त्यानंतरही घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी त्यांचे न ऐकता तो प्लॉट त्यांचे मालक अदानीला दिला. आज कळतंय की महापालिकेला राज्य सरकारने तो प्लॉट परत घेण्याचे आदेश दिले आहेत. तो प्लॉट स्वच्छ करा. त्यासाठी दोन अडीच हजार कोटी किती लागतील ते वापरा व त्यानंतर तो अदानीला द्या असे आदेश देण्यात आले आहेत. जर हे असेच सुरू राहिले तर लोकं रस्त्यावर उतरतील. आम्ही गोराईचे डंपिंग ग्राऊंड बायोमायनिंग करून त्यावर गार्डनर तयार केलं होतं. तसंच देवनारचं देखील करता आलं असतं. पण ते न करता सगळ्या जमिनी अदानीच्या घशात घालायच्या. जणू काही मुंबई अदानी कंपनीला देऊन टाकायची आहे. कोणतंही नवीन टेंडर अदानीला दिलं जात आहे. सगळं काही अदानीला द्यायचं. हा अदानी कर नक्की काय आहे. कराचा बोझा मुंबईकरांवर आणि जमीन अदानीला हा कुठचा न्याय भाजपने आणला आहे. जर या विरोधात मुंबईकर रस्त्यावर उतरले तर त्याला जबाबादार भाजप व त्यांचे खरे मालक अदानी असतील. ईव्हीएममध्ये घोटाळे करून जे सरकार आणलं ते जनतेसाठी आणलं की अदानीसाठी”, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारला फटकारले.

”गेली दोन अडीच वर्ष मुंबईला कसं लुटलं जातंय, महाराष्ट्राचे कसे हाल केले जात आहेत हे लोकांसमोर आहे. प्रत्येक वॉर्डातून पाण्याचे प्रश्न आहेत. कुठे पाण्याचा दाब कमी आहे, पाणीपुरवठा होत नाही, अनियमित पाणीपुरवठा, गढूळ पाणी असे प्रश्न आहेत. कुणाला वाटतं जास्त पाणी हायराईजला जातं. हायराईजला वाटतं की पाणी मॉल्समध्ये वळवलं जातं. सदनात अनेकदा हा प्रश्न आम्ही विचारलाय. पाणी नेमकं मुंबईचं गेलंय कुठे? गढूळ पाणी का येतंय? अजून उत्तर आलेलं नाही. हवामान बदल हा एक मोठा प्रश्न आहे. खराब हवेचा मुंबईला धक्का बसायला लागला आहे. मुंबई दिसेनाशी झालेली आहे. सी लिंकवरून मुंबई दिसत नाही. सी लिंकवर शंभर मिटरवरचं दिसत नाही. मुंबईचं हवेची गुणवत्ता खराब होत चालली आहे . महानगरपालिका असो राज्य सरकार असो उपाययोजना करायचं तर सोडा नागरिकांना उत्तर द्यायला कुणी पुढे येत नाही. असे हाल सगळीकडे झाले आहेत. मुंबई सगळीकडे खोदून ठेवली आहे. कुठे रस्ते खोदलेयत, कुठे सिवेजच्या लाईनसाठी खोदलंय. महापालिकेच्या निवडणूका न झाल्याने नगरसेवक नाहीत. त्यामुळे नागरिकांशी संवाद होत नाही”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;