Mahakumbh 2025 – महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीची घटना किरकोळ; योगी सरकारमधील मंत्री बरळले

Mahakumbh 2025 – महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीची घटना किरकोळ; योगी सरकारमधील मंत्री बरळले

Mahakumbh 2025 प्रयागराज येथे मौनी अमावस्येनिमित्त संगम घाटाजवळ अमृतस्नानासाठी प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीच्या रेट्यामुळे चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली असून यात सुमारे 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. तरीही या ठिकाणी चेंगराचेंगरी झालीच नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांच्या या भूमिकेवर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर चेंगराचेगरीची घटना किरकोळ आहे, असे योगी सरकारमधील मंत्री संजय निषाद यांनी म्हटले आहे. या गंभीर घटनेबाबत निषाद बरळल्यामुळे त्यांच्याविरोधात संताप व्यक्त होत आहे.

योगी सरकारमधील मंत्री संजय निषाद यांनी महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की महाकुंभमेळ्यासारख्या इतक्या मोठ्या गर्दीत अशा किरकोळ घटना घडतात. महाकुंभात ज्या घाटावर जागा मिळेल तिथे लोकांनी स्नान करावे. संगम घाटावर स्नानासाठी आग्रही राहू नये, तसेच जनतेने अफवांकडे लक्ष देऊ नये, असे आवाहनही निषाद यांनी केले आहे.

मौनी अमावस्येनिमित्त महाकुंभात गर्दी जमली होती. बुधवारी पहाटे 1.30 वाजण्याच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 10 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, उत्तर प्रदेश सरकारने अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर केली नाही. मात्र, योगी सरकारमधील मंत्री निषादला यांनी ही किरकोळ घटना असल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात संताप व्यक्त होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;