सौदी अरेबियामध्ये भीषण अपघातात 9 हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू

सौदी अरेबियामध्ये भीषण अपघातात 9 हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू

सौदी अरेबियामध्ये बुधवारी एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 9 हिंदुस्थानीयांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेबाबत हिंदुस्थानच्या वाणिज्य दूतावासाने माहिती दिली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शोक व्यक्त केला असून हिंदुस्थानी दूतावासाने पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.तसेच मृतांच्या कुटुंबियांच्या संपर्कात असल्याचेही स्‍पष्‍ट केले आहे.

या घटनेबाबत हिंदुस्थानच्या वाणिज्य दूतावासाने एक्सवर ट्विट केले आहे. त्यात, सौदी अरेबियाच्या पश्चिम विभागातील जिझानजवळ झालेल्या या रस्ते अपघातात 9 हिंदुस्थानी नागरिकांच्या या दुर्देवी मृत्यूबद्दल आम्ही पीडित कुटुंबांप्रती मनापासून शोक व्यक्त करतो.पुढे लिहीले की, जेद्दाहमधील हिंदुस्थानच्या वाणिज्य दूतावास पूर्ण मदत करत आहेत. तसेच आमचे अधिकारी त्या कुटुंबियांच्या संपर्कात आहेत. आम्ही जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो. या संदर्भात अधिक माहितीसाठी एक विशेष हेल्पलाइन देखील सुरू केली आहे.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या घटनेबाबत एक्सवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या अपघाताबद्दल आणि जीवितहानीबद्दल जाणून घेतल्याबद्दल दुःख झाले. जेद्दाहमधील वाणिज्य दूतावासाशी संपर्क झाला आहे. येथील वाणिज्‍य दुतावास दुर्घटनाग्रस्‍तांच्‍या कुटुंबांच्या संपर्कात आहेत. दुःखद परिस्थितीत पूर्ण मदत करत आहेत, असे त्‍यांनी आपल्‍या X पाेस्‍टमध्‍ये म्‍हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;