Mahakumbh 2025 – प्रयागराज येथील दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू…तरीही पोलीस म्हणतात चेंगराचेंगरी झालीच नाही!

Mahakumbh 2025 – प्रयागराज येथील दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू…तरीही पोलीस म्हणतात चेंगराचेंगरी झालीच नाही!

Mahakumbh 2025 प्रयागराज येथे मौनी अमावस्येनिमित्त संगम घाटाजवळ अमृतस्नानासाठी प्रचंड गर्जी झाली होती. या गर्दीच्या रेट्यामुळे चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली असून यात सुमारे 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती सर्व वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमांवरही व्हायरल झाले आहेत. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत, तरीही या घटनेबाबत पोलिसांनी वेगळेच वक्तव्य केले आहे. या ठिकाणी चेंगराचेंगरी घडलीच नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांच्या या भूमिकेवर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

प्रयागराज येथील महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीची घटना आणि त्यात 10 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत आणि तेथील गैरसोयीबाबत देशभरातून नाराजी व्यक्त होत आहे. मात्र, कुंभनगरचे एसएसपी राजेश द्विवेदी यांच्या विधानामुळे एक नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांनी चेंगराचेंगरीच्या घटनेचा इन्कार केला आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी सांगितले की, महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीची कोणतीही घटना घडलेली नाही.

गर्दीमुळे ही घटना घडली आणि त्यात काही लोक जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. एसएसपी राजेश द्विवेदी यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. पोलिसांच्या या विधानांवर नेटकरी नाराजी व्यक्त करत असून संतपा व्यक्त केला आहे. अनेकांनी या अपघातासाठी त्याच्या गैरव्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे. एसएसपी राजेश द्विवेदी त्यांच्या या वक्तव्यामुळे सध्या चर्चेत आहेत.

राजेश द्विवेदी म्हणाले की, येथे चेंगराचेंगरीचा प्रश्नच नव्हता. गर्दी थोडी जास्त होती, त्यामुळे काही भाविक जखमी झाले. यासोबतच, त्यांनी सांगितले की लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये आणि जे घाट कमी गर्दीचे आहेत तिथेच आंघोळ करावी. मूळचे उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील आयपीएस राजेश द्विवेदी यांनी पदवीनंतर एमबीए पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांनी यूपी एटीएस, यूपी एसटीएफमध्ये सेवा देण्याव्यतिरिक्त, अनेक जिल्ह्यांमध्ये डीएसपी, अतिरिक्त एसपी आणि जिल्हा पोलिस कॅप्टन म्हणूनही काम केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;