बुलढाण्यातील दुर्मिळ घटनेने डॉक्टरही अवाक, महिलेच्या गर्भातील बाळाच्या पोटात आढळलं बाळ

बुलढाण्यातील दुर्मिळ घटनेने डॉक्टरही अवाक, महिलेच्या गर्भातील बाळाच्या पोटात आढळलं बाळ

बुलढाण्याच एक मोठी घटना समोर आली आहे. एका 32 वर्षीय गर्भवती महिलेच्या सोनोग्राफीत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेच्या गर्भातील बाळाच्या पोटात बाळ असल्याचे समोर आले आहे. या घटनेने सर्वाच चकीत झाले असून हे एक दुर्मिळ प्रकरण आहे.

बुलढाण्याच्या या महिलेचा 32 वा आठवडा सुरू होता. त्याच दरम्यान तिची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांना संशयास्पद वाटल्याने त्यांनी तिला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांना जे दिसले त्यावर त्यांना विश्वास बसत नव्हता. महिलेच्या पोटात बाळ दिसले आणि त्या बाळाच्या पोटातही बाळ असल्याचे समोर आले. त्यामुळे सर्वच चकीत झाले असून सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे.

ही अनोखी घटना बुलडाण्याच्या जिल्हा रुग्णालयात घडली आहे. ही दुर्मिळ घटना असून जगाच्या इतिहासात अशाप्रकारच्या घटनेच्या 200 नोंदी आहेत. तर देशातील ही आठ-नऊ प्रकरणे समोर आली आहेत. अशा प्रकारच्या परिस्थितीला वैद्यकीय भाषेत ‘फिटस इन फिटो’ असे बोलले जाते. महिलेच्या प्रसूतीनंतर बाळावर शस्त्रक्रिया करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;