Mahakumbh 2025 – महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाली कशी? उपस्थित भाविकांनी सांगितली आपबीती

Mahakumbh 2025 – महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाली कशी? उपस्थित भाविकांनी सांगितली आपबीती

उत्तर प्रदेशच्या महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाली. त्यात अनेक भाविकांचा मृत्यूही झाला. चेंगराचेंगरी नेमकी कशी याची आपबिती उपस्थित भाविकांनी सांगितली. स्पेशल ड्युटीवर असलेल्या आकांक्षा राणा म्हणाल्या की संगमजवळील गर्दीमुळे बॅरीयर तुटले आणि चेंगराचेंगरीत अनेकजण जखमी झाले. या सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं गेलं. नेमके किती लोक जखमी झाले हे सांगता येत नाही असेही राणा यांनी सांगितले.

या कुंभमध्ये कर्नाटकहून आलेल्या सरोजिनी म्हणाल्या की आम्ही दोन बस करून 60 जण आलो होतो. आमच्या ग्रुपमध्ये नऊ जण होते. कुंभमध्ये जाताना अचानक गर्दीचा लोंढा आमच्या अंगावर. या गर्दीत आम्ही आडकलो. अनेकजण आमच्या अंगावर पडले, संपूर्ण गर्दी नियंत्रणाच्या बाहेर होती असे त्यांनी सांगितले.

मध्य प्रदेशमधून आलेल्या एका माणसाने सांगितले की माझी आई जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच मेघालयमधून एक वृद्ध दाम्पत्य या चेंगरांचेंगरीत कसे बसे बचावल्याचेही त्यांनी सांगितले.

एका महिलेचा मुलगा या चेंगराचेंगरीत जखमी झाला. त्यांना सांगितले की या गर्दीतून बाहेर पडायला जागाच नव्हती. काही लोक हसत खिदळत आम्हाला ढकलत होते, आम्ही पाया पडून त्यांना असे करू नका म्हणत होतो असेही या महिलेने यावेळी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;