केळीची साल कचरा नाही तर….. जाणून घ्या अनेक फायदे
On
केळी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. केळी खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते आणि पचनसंस्था देखील निरोगी राहते. पण केळी खाल्ल्यानंतर त्याची साल लगेच फेकून देतो. मात्र, केळीची साल कचरा नसून ती तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते. यामध्ये असलेले पोषक आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म फकत तुमची त्वचा सुधारत नाही तर ती निरोगी आणि तरुण ठेवण्यास मदत करते. केळीच्या सालीचे अनेक फायदे तुम्हाला माहित आहे का? जाणून घेऊ सविस्तर…
- केळीच्या सालीमध्ये कॅलरी, कार्बोहायड्रेट्स, शुगर, फायबर, पोटॅशिअम, व्हिटॅमिन ए, कॅल्शिअम आणि आयरनसोबत भरपूर पोषक तत्व असतात. त्यामुळे केळीच्या सालीचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतात. यामुळे पोषक तत्व शरीर मजबूत करण्यासाठी गरजेचं असतात.
- तसेच केळीच्या सालीमध्ये ट्रिप्टोफॅन असतं, ज्याने मूड डिसऑर्डर आणि डिप्रेशनपासून आराम मिळतो.
- आणि केळीच्या सालीचा उपयोग त्वेचवरील मुरुम आणि डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी देखील होतो.
- केळीच्या सालीमध्ये मध आणि लिंबाचा रस घालून फेस मास्क तयार करता येतो यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते.
- तसेच केळीच्या सालीच्या वापराने यामध्ये असलेले एंटीऑक्सीडेंट त्वचेवरील सुरकुत्या कमी करतात.
केळीच्या सालीमध्ये पॉलीफेनोल्स, कॅरोटीनॉयड आणि इतर एंटीऑक्सिडेंट भरपूर असतात. कच्च्या केळीची साल खाल्ल्याने तुमच्या एंटीऑक्सीडेंट लेव्हल वाढते आणि कॅन्सरचा धोका कमी केला जाऊ शकतो.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List