हॅंडसम हंक अभिनेत्याने साकारली गेची भूमिका; बोल्ड सीन देऊन ओलांडल्या सगळ्या मर्यादा

हॅंडसम हंक अभिनेत्याने साकारली गेची भूमिका; बोल्ड सीन देऊन ओलांडल्या सगळ्या मर्यादा

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या भूमिका स्विकारून प्रेक्षकांची मने जिंकली. तर काही कलाकारांच्या भूमिका इतक्या हटके पाहायला मिळाल्या प्रेक्षकही गोंधळात पडले. असाच एक बॉलिवूड अभिनेता ज्याला इंडस्ट्रीमधली हँडसम हंक म्हटलं जात. या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट दिले आहेत. त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या व्यक्तिमत्वाची जास्त चर्चा झाली होती.

प्रसिद्ध अभिनेत्याचा चित्रपटात चक्क बोल्ड सीन 

बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा हा अभिनेता पाकिस्तानी आहे. पण तरीही त्याचा भारतातही त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. मात्र आता या अभिनेत्यानं एका टिव्ही शोमध्ये गेची भूमिका साकारली आहे. पण त्यातील त्याचे काही बोल्ड सीनपाहून चाहत्यांनाही धक्काच बसला. हा अभिनेता आहे फवाद खान.

‘जिंदगी गुलजार है’, ‘हमसफर’, ‘बेहद’, ‘अरमान’ आणि ‘दास्तान’ सारखे शो अनेक तरुणांनी पाहिले असतील. मुळत: पाकिस्तानी असलेले हे शो भारतीयांनाही आवडतात. या सगळ्या शोमधून एक चेहरा समोर आला तो म्हणजे अभिनेता फवाद खान. गेल्या वर्षी त्याने एका शोमध्ये काम करून खळबळ उडवून दिली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Fawad A Khan (@fawadkhan81)

‘बरजाख’ हा टीव्ही शो 2024 साली आला होता. यामध्ये फवाद खानसोबत सनम सईद होती. मात्र हा शो पाहताच संपूर्ण पाकिस्तानात फक्त फवादचीच चर्चा होती. कारण या शोमध्ये एका गे कपलचा रोमान्स दाखवण्यात आला आहे. त्यातील एक भूमिका ही फवादची होती.

फवादच्या गे सीनमुळे खळबळ

‘बरजाख’या 6 भागांच्या मालिकेत अशी दृश्ये दाखवण्यात आली होती की चाहतेही हैराण झाले होते. सनम आणि फवादने हा शो साइन केल्यामुळे अनेक स्टार्सनी ट्रोल केलं होतं. बऱ्याच वादानंतर ‘बरजाख’ हा शो यूट्यूबवरून हटवावा लागला. सध्या हा शो OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर आहे.

फवाद खानचं भारतीय कनेक्शन

फवाद खान पाकिस्तानात राहत असला तरी त्याच्या कुटुंबाचे भारताशी संबंध आहेत. फवाद खानच्या वडिलांचा जन्म पंजाबमधील पटियाला येथे झाला. तर त्याच्या आईचे कुटुंब मूळचे लखनौचे होते. पण फाळणीनंतर सगळे पाकिस्तानात गेले. फवाद खानने पाकिस्तानच्या अशा काही टीव्ही शोमध्ये काम केले होते जे आजही लोकांना पाहायला आवडतात.

फवाद पाकिस्तानातील श्रीमंत अभिनेता

फवाद खानची गणना पाकिस्तानच्या श्रीमंत अभिनेत्यांमध्ये केली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती 40 कोटी रुपये आहे. एवढेच नाही तर त्याला आलिशान गाड्यांचाही शौक आहे. त्याच्याकडे वेगवेगळ्या गाड्यांचे कलेक्शन आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;