…अन्यथा आम्ही आंदोलनाची पुढील दिशा ठरवू; मनोज जरांगे यांचा मुख्यमंत्र्यांना अल्टीमेटम

…अन्यथा आम्ही आंदोलनाची पुढील दिशा ठरवू; मनोज जरांगे यांचा मुख्यमंत्र्यांना अल्टीमेटम

मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एखदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. बुधवारी त्यांचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे. जरांगे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांना आज संध्याकाळपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. आमच्या मागण्या पूर्ण करणार आहात की नाही, ते त्यांनी सांगाने, अन्यथा आम्ही आंदोलनाची पुढील दिशा ठरवू, असा इशाराही जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

सरकार आमच्या मागण्या पूर्ण करणार आहेत की नाही हे त्यांनी सांगावं. अनेक लोक उपोषणाला बसले आहेत आम्ही ज्या मागण्या केल्यात त्या पूर्ण करणार की नाही? हे सांगावं, म्हणजे आम्ही आमच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवू. आज 5 दिवस उलटूनही मुख्यमंत्र्यांनी काही निर्णय घेतला नाही. मराठी आरक्षण देणार की नाही, हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. मी माझ्या मतावर ठाम आहे. त्यामुळे त्यांनी हो किंवा नाही म्हणून सांगावे, म्हणजे आम्हाला पुढील दिशा ठरवता येईल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि सरकारला दिला आहे.

आमच्या सोबत बेइमानी केली तर पाच वर्ष नीट सत्ता चालू देणार नाही. त्यामुळे सरकारने स्पष्ट सांगून टाकावे, आरक्षण देणार आहेत की नाही. मुख्यमंत्र्यांनी आज संध्याकाळपर्यंत संगावे. तुम्ही मराठ्यांना सुखाने खाऊ दिले नाही तर तुम्हाला 5 वर्ष सुखाने सत्ता करू देणार नाहीत. त्यामुळे तोंड लपवू नका, मराठ्यांचा विरोधक कोण आहे हे आम्हाला कळणे गरजेचे आहे, असे ही मनोज जरांगे पाटील म्हणाले. आता जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी आज संध्याकाळपर्यंतचा वेळ देत पुन्हा एकदा अल्टीमेटम दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;