महाकुंभमध्ये रात्री एक वाजता नेमकं काय झालं, असं काय घडलं की चेंगरांचेंगरी झाली?

महाकुंभमध्ये रात्री एक वाजता नेमकं काय झालं, असं काय घडलं की चेंगरांचेंगरी झाली?

उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाली. यात अनेक भाविक जखमी झाले आहेत. ही दुर्घटना नेमकी कशी झाली यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, रात्री एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान आखाडा मार्गावर काही भाविक बॅरिकेड्स ओलांडून आत येण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा काही भाविक जखमी झाले. या जखमी भाविकांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यातील काही भाविक हे गंभीर जखमी झाले होते.

या महाकुंभसाठी जवळपास 8 ते 10 कोटी भाविक आल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. काल साडे पाच कोटी भाविकांनी महाकुंभमध्ये स्नान केले. संगम नोजवर मोठ्या प्रमाणात भाविक आल्याने मोठी गर्दी झाली आहे. प्रशासनाने सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले असून सर्वांवर उपचार सुरू आहेत. महाकुंबमध्ये झालेल्या या चेंगराचेंगरीमुळे अफवा पसरल्या जात आहेत. लोकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येनिमित्त प्रशासनाने तयारी केली होती अशी माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी भाविकांवाबाबत माहिती घेत आहेत. दुसरीकडे महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाल्याने संपूर्ण प्रशासन हाय अलर्टवर आहे. चेंगराचेंगरी झाल्यानंतरही मौनी अमावस्येसाठी लोकांनी गर्दी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;