Mahakumbh 2025 – आयुक्तांनीच व्यक्त केली होती चेंगराचेंगरीची भीती; गर्दी टाळण्याचे केले होते आवाहन

Mahakumbh 2025 – आयुक्तांनीच व्यक्त केली होती चेंगराचेंगरीची भीती; गर्दी टाळण्याचे केले होते आवाहन

Mahakumbh 2025 प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमध्ये मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानासाठी प्रचंड गर्दी झाली आहे. या गर्दीच्या लोंढ्यांमुळे त्रिवेणी संगमाजवळ चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाला, तर अनेक भाविक जखमी झाले आहेत. अनेक प्रसारमाध्यमांतून संगम घाटावरील स्नानाचे महत्त्व अधोरेखीत करण्यात आल्याने या घाटवर अमृत स्नानासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. इतर घाटावरही स्नानाची सोय असूनही भाविक संगम घाटावरच स्नानासाठी येत होते. त्यामुळे या ठिकाणी गर्दी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच घटनेपुर्वीच आयुक्तांनी चेंगराचेंगरीची भीती व्यक्त करत भाविकांना लवकरात लवकर स्नान करण्याचे आवाहन करत होते. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये संगम घाटावर उद्घोषणा करण्यात येत असल्याचे दिसत आहे. उद्घोषणा करत भाविकांना प्रयागराजचे आयुक्त विजय विश्वास पंत काही सूचना करत आहेत. महाकुंभ मेळ्याला आलेल्या भाविकांना लवकरात लवकर स्नान करण्याचे आवाहन ते करत आहेत. उद्घोषणाद्वारे आयुक्त सांगत आहेत की, सर्व भाविकांनी आमचे ऐकावं, येथे झोपून राहण्यात काही अर्थ नाही. जो झोपून राहतो, तो गमावतो. उठा उठा, स्नान करा. हे तुम्ही सुरक्षित राहण्यासाठी आहे. आज स्नानासाठी प्रंचड गर्दी होण्याची शक्यता आहे. गर्दी वाढल्यावर चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे. तुम्ही आधी आला आहात, त्यामुळे तुम्हाला सर्वात आधी अमृत मिळायला हवे. सर्व भाविकांना हात जोडून विनंती आहे. उठा, झोपू नका. जर सर्वात आधी आला आहात. तुम्ही स्नान करून घ्या, असे आवाहन आयुक्त भाविकांना करत आहेत.

अनेक भाविक सूर्योदयाची वाट बघत स्नानासाठी थांबले होते. त्या भाविकांना आयुक्तांनी गर्दी टाळण्यासाठी लवकरात लवकर स्नान करण्याचे आवाहन करत आहेत. लोकांना स्नानासाठी जाण्याचे आवाहन करताना आयुक्तांनी चेंगराचेंगरी होण्याची शक्यता वर्तवली आहे, त्यावरून आता टीका होत आहे. चेंगराचेंगरी होण्याची अफवा आयुक्तच पसरवत असतील, तर दुर्घटना कशी होणार नाही? असा सवालही विचारण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;