जालन्यात छत्रपती संभाजीनगर रोडवर अपघात, दोन जण जागीच ठार

जालन्यात छत्रपती संभाजीनगर रोडवर अपघात,  दोन जण जागीच ठार

जालन्यातून छत्रपती संभाजीनगरकडे दुचाकीस्वार जात असताना औद्योगिक वसाहतीजवळ हाॕटेल सनराईज समोर छत्रपती संभाजीनगरहून येत असलेला कंटनेर औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी वळत होता. तितक्यात भरधाव दुचाकी कंटेनेरवर धडकल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 28 जानेवारी मंगळवार रोजी रात्री घडली.

बबन पठाडे (49) आणि बाळू गव्हाड (32) दोन्ही रा.कवडगाव ता. जि.संभाजीनगर अशी मृतांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक वेताळ आणि हेड काॕ. देशमुख हे घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून मयतांना जालन्यातील घाटी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे.कंटनेरला पोलीसांनी चंदनझीरा पोलीस ठाण्यात लावले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;