Santosh Deshmukh Case – धनंजय मुंडेंनी नैतिकतेवर राजीनामा द्यावा, त्यांचा स्वतःचा पक्षही राजीनामा मागतोय; सुप्रिया सुळे यांचा निशाणा

Santosh Deshmukh Case – धनंजय मुंडेंनी नैतिकतेवर राजीनामा द्यावा, त्यांचा स्वतःचा पक्षही राजीनामा मागतोय; सुप्रिया सुळे यांचा निशाणा

अंजली दमानिया, संदीप क्षीरसागर यांनी मोठं विधान केलं आहे. तसेच ऑफिस ऑफ फ्रॉफीटचा आरोप होतोय. सोनिया गांधींवर ऑफिस ऑफ फ्रॉफीटचे आरोप झाले तेव्हा सोनियाजी मंत्रीही नव्हत्या. त्या फक्त खासदार होत्या तरीही त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला होता. आणि संतोष देशमुख यांची हत्या हा राजकीय विषय नाही, हा सामाजिक विषय आहे, असे म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे राज्यातील महायुती सरकार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या निशाणा साधला. सुप्रिया सुळे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली.

आम्ही काय मागणी करतोय, सगळेच पक्ष आहे, त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाही समावेश आहे. कुठला पक्ष राजीनामा मागत नाहीये. त्यांचा स्वतःचा पक्षही राजीनामा मागतोय. राजीनामा आम्ही नैतिकतेवर मागतोय. लोकशाहीमध्ये त्या संविधानाच्या चौकटीत करतोय. पुरावे तर सगळेच देत आहेत. रोज नवीन पुरावा समोर येत आहे, असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला.

अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक आणि छगन भुजबळ या सगळ्यांना ऐकिव बातम्यांवर अटक झाली होती. वर्ष-वर्ष जेलमध्ये होते. इथे तर पुरावेही आहेत. आणि सत्तेमधले आमदारही मागणी करत आहेत. आम्ही विरोधक आहोत, आम्ही एकतर्फी असू. शिवसेना, काँग्रेस सगळे विरोधक बाजूला ठेवा. पण सत्तेतील तिन्ही पक्षाचे लोकही तेच म्हणताहेत. धनंजय मुंडे यांना वाचवलं जात असल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मी एखाद्या पक्षात काम करत असेल. 50 दिवस माझ्यामुळे रोज पक्षाची हेडलाईन होत असेल तर नैतिकतेने मी पहिल्याच दिवशी राजीनामा दिला असता. मी पक्ष वाढवायला आलेली आहे आणि पक्षाला अडचणीत आणण्यासाठी नाही. माझ्यामुळे रोज हेडलाईन होत असेल. तर मी एक पाऊल मागे घेते. माझी चौकशी करा आणि दूध का दूध पाणी का पाणी मी केलं असतं, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

50 दिवस झाले एक खुनी मिळत नाही तुम्हाला. फरार असेल तर कुठे झाला? चेष्टा करताय देशमुख कुटुंबाची आणि राज्याची? 50 दिवस झाले एक फरार माणूस सरकारला मिळत नाही. काय करतेय यंत्रणा? हा गंभीर प्रश्न आहे, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारला केला. 50 दिवसांपूर्वी या राज्यातल्या एका मुलाची हत्या झाली. त्याचं कुटुंब आणि संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या कुटुंबासाठी आणि परभणीच्या घटनेसाठी न्याय मागतंय. या सरकारने नैतिकता ठेवून या दोन्ही कुटुंबाना आणि महाराष्ट्रा न्याय द्यावा. एवढीच आमची मागणी असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;