‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत मोठा ट्विस्ट; आकाश-वसुंधराचा जीव धोक्यात
झी मराठी वाहिनीवरील 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. एका बाजूला वसुंधराचे पाय पकडून विशाखा मदतीसाठी विनंती करतेय. वसुंधराची एक अट आहे की विशाखाने एका कोऱ्या कागदावर सही करावी.
सही केल्यावर वसुंधरा त्या कागदावर लिहिते की, "तनयाला घरातील सगळी कामं एकटीला करावी लागतील." तनया सगळी घरकामं एकटीच करतेय, यामुळे ती विशाखावर चिडू लागली आहे. या सगळ्यात तनया अचानक बेशुद्ध पडते, यात ती गरोदर असल्याचं निदान होतं. हे ऐकून घरातील सगळे आनंदित आहेत. पण तनया खरंच गरोदर आहे का, असा प्रश्न आहे.
तनया तिच्या गरोदरपणाचा फायदा घेत इतरांना घराची कामं पूर्ण करायला लावते. ती स्वतःची खोली बदलून मोठी खोली मागते. ज्यामुळे वसुंधरा, आकाश आणि त्यांच्या मुलांना लहान खोलीत जावं लागतं. तरीही वसुंधरा आणि तिचं कुटुंब आनंदी आहे. ज्यामुळे तनयाला अजूनच चिड येते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List