चाईबासामध्ये चकमक; सुरक्षा दलाने 2 नक्षलवाद्यांचा केला खात्मा, 1 जवान जखमी

चाईबासामध्ये चकमक;  सुरक्षा दलाने 2 नक्षलवाद्यांचा केला खात्मा, 1 जवान जखमी

झारखंडच्या पश्चिमी सिंहभूल जिल्ह्यात चाईबासामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला तर यात एक जवान जखमी झाला आहे. तर अनेक जण जखमी असल्याची शक्यता वर्तवली आहे. छत्तीसगड आणि झारखंडमध्ये सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांवर झारखंड पोलीस, 209 कोब्रा बटालियन आणि इतर सुरक्षा दलांकडून ही कारवाई केली जात आहे.

झारखंड आणि छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी कारवाया तीव्र करण्यात आल्या आहेत. सुरक्षा दलांना अलीकडच्या काळात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात अनेक यश मिळाले आहे. याआधीही सुरक्षा दलांनी चाईबासा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांविरोधात अनेक यशस्वी कारवाया केल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून दोन इन्सास रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. खात्मा करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही, मात्र या परिसरात नक्षलवादी असल्याच्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. चकमकीनंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून संभाव्य लपलेल्या नक्षलवाद्यांचा शोध सुरू आहे. या चकमकीत अनेक नक्षलवादी जखमी झाल्याची शक्यता असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;