ज्याच्यासाठी ठरलेलं लग्न मोडलं, तोच पळून गेला! अभिनेत्रीने सांगितली स्वतःची कहाणी

ज्याच्यासाठी ठरलेलं लग्न मोडलं, तोच पळून गेला! अभिनेत्रीने सांगितली स्वतःची कहाणी

सिनेमा म्हटलं की लग्न, अफेअर, घटस्फोट, ड्रामा या सगळ्या गोष्टी त्यात आल्याचं. मात्र फक्त सिनेमातच नाही तर प्रत्येक सेलिब्रेटींच्या आयुष्यात अशा गोष्टी घडत असतात. अनेकजण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मुलाखतीत बोलताना दिसातात, तर अनेकजण याबाबत मौन बाळगणचं पसंत करतात. आता पर्यंत अनेक सेलिब्रेटींनी आपले अनुभव प्रेक्षकांसोबत शेअर केले आहेत. अशातच आता सध्या चर्चा आहे ती म्हणजे बिग बॉस फेम मराठमोळी अभिनेत्री मीरा जगन्नाथची.

अभिनेत्री मीरा जगन्नाथने “माझ्या नवऱ्याची बायको” आणि “ठरलं तर” या मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. यानंतर ती बिग बॉस मराठीच्या 3 सीझन मध्ये दिसली. या शोमुळे मीराला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. दरम्यान, आता मीरा एका मुलाखतीत तिच्या लव्ह लाईफबद्दल बोलली आहे. मीरा एका मुलासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे तिने सांगितलं. मात्र, तो मुलगा तिच्याशी लग्न करणार नसल्याचे त्याने सांगितले होतं. त्यामुळे त्या मुलाशी नाते तोडून तिने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला, असे ती एका मुलाखतीत म्हणाली आहे.

मीराचा ब्रेकअप झाल्यानंतर तिचं दुसऱ्या एका मुलासोबत लग्न ठरलं. साखरपुडा आणि लग्न ठरलं. सगळं काही सुरळीत सुरू असताना साखरपुड्याच्या दिवशी तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिला कॉल केला. “हे लग्न करू नको. मी आलोय, मला येऊन भेट, असं त्याने मीराला सांगितलं. एक्स बॉयफ्रेंडच्या सांगण्यावर विश्वास ठेवून मीराने साखरपुडा मोडला, असं मीरा म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Navshakti (@navshaktiofficial)

मी साखरपुडा मोडला आणि त्याला भेटायला निघून गेली. पण झालं काहीतरी भलतंच. मी गेली पण माझा बॉयफ्रेंड मला भेटायला आलाच नाही. आणि पुन्हा त्याने माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्नही केला नाही. या सगळ्या गोष्टीत माझ्या घरच्यांना फार त्रास झाला. मलाही याचा मोठा धक्का बसला, असा भयंकर अनुभव मीराने शेअर केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;