एकनाथ शिंदेंवर ईडीची टांगती तलवार, ते मंत्रीपद सोडणार नाहीत; संजय राऊत यांची जोरदार टीका

एकनाथ शिंदेंवर ईडीची टांगती तलवार, ते मंत्रीपद सोडणार नाहीत; संजय राऊत यांची जोरदार टीका

धनंजय मुंडे हे अजित पवार गटाचे मंत्री आहेत. पण खुलासा करायला त्यांना दिल्लीत जावं लागतं अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच एकनाथ शिंदेंवर ईडीची टांगती तलवार, ते मंत्रीपद सोडणार नाहीत असेही संजय राऊत म्हणाले.

आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र वाऱ्यावर टाकून नेहमी फिरत असतात. आधी दावोसला होते आता दिल्लीत प्रचारासाठी गेले आहेत. उद्या आणखी कुठे तरी जातील. महाराष्ट्राची जबाबादारी आपल्यावर पडलेली आहे, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. पण ते स्टार प्रचारक आहेत, महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाने जागा जिंकल्या आहेत, त्याचे श्रेय फडणवीसांना दिलं जातंय. आणि महाराष्ट्राचाच फॉर्म्युला दिल्लीत वापरला तर प्रचार न करताही भाजप जिंकेल. पण दिल्ली हे लहान राज्य असून केंद्रशासित आहे. त्यामुळे ते दयाबुद्धीने विचार करू शकतात.

तसेच गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांना वरिष्ठ आहेत. शिवसेनेत असतानाही गणेश नाईक जेव्हा मंत्री होते, तेव्हा एकनाथ शिंदे कुठेच नव्हते. राजकीयदृष्ट्या गणेश नाईक आज कुठल्या पक्षात आहेत हे सोडा, पण गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांना वरिष्ठ असून त्यांचा अनुभव मोठा आहे. एक मंत्री म्हणून आपापल्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यात लोकांचा प्रश्न सोडवण्याचा त्यांचा अधिकार आहे. त्यात मला चुकीचे काही वाटत नाही. एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत फिरावं ते ही मंत्री आहेत. पण ते रुसून बसले आहेत असं कळलंय मला. गणेश नाईक यांनी दोन पक्ष बदलले आहेत. एकनाथ शिंदे यांनी एकच पक्ष बदलला आहे. जेव्हा एकनाथ शिंदे आणखी बदलतील त्यांच्या वरिष्ठपदावरून त्यांच्यात स्पर्धा होईल.

एकनाथ शिंदे नाराज आहेत की नाही हे त्यांनी सांगायला पाहिजे, आपण कसं सांगणार त्याबद्दल. किंवा फडणवीसांचे जे बॉस आहेत त्यांनी सांगायला पाहिजे की शिंदे नाराज आहेत. ज्या अर्थी ते मंत्रीपदाला चिकटून बसले आहेत त्या अर्थी ते नाराज नाहीत. त्यांना बिनखात्याचे मंत्री केले तरी ते मंत्रीपद सोडणार नाहीत आणि मी नाराज आहे असं कधीच बोलणार नाहीत. तेवढी हिंमत लागते. कारण त्यांच्या डोक्यावर ईडी आणि तपासयंत्रणांची टांगती तलवार आहे असेही संजय राऊत म्हणाले.

धनंजय मुंडे हे अजित पवार गटाचे मंत्री आहेत. पण खुलासा करायला त्यांना दिल्लीत जावं लागतंय. त्यांच्या पक्षाचे राष्टीय अध्यक्ष मुंबई, बारामतीत आहेत. पण त्यांच्या पक्षाचा मंत्री खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातो ही महाराष्ट्राची अवस्था आहे. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात मिलीभगत आहे. कुणाचा काय संबंध हे अजित पवार नाही तर न्यायालय आणि पोलीस सांगतील. याचा अर्थ तुम्ही पोलिसांवर दबाव आणत आहात. तुम्ही एखाद्याला क्लीन चीट देत आहात ज्याच्याविरोधात रोष आहे. अजित पवार ज्या प्रकारची भाषा वापरत आहेत त्यावरून तुम्ही अप्रत्यक्षपणे न्यायव्यवस्था, पोलिसांवर आणि या प्रकरणात जे न्याय मागत आहेत त्यांच्यावर दबावण आणत आहेत असेही संजय राऊत यांनी नमूद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;