Maha Kumbh Stampede – प्रशासन पूर्णपणे फेल, व्हिआयपींच्या हुजरेगिरीत व्यग्र असल्याने चेंगराचेंगरी; महामंडलेश्वर प्रेमानंद पुरींना रडू कोसळलं

Maha Kumbh Stampede – प्रशासन पूर्णपणे फेल, व्हिआयपींच्या हुजरेगिरीत व्यग्र असल्याने चेंगराचेंगरी; महामंडलेश्वर प्रेमानंद पुरींना रडू कोसळलं

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात आज पहाटे चेंगराचेंगरी झाली. यात 10 भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर अनेक भाविक जखमी झाले आहेत. मौनी अमावस्ये निमित्त अमृत स्नानासाठी त्रिवेणी संगमावर प्रचंड गर्दी झाली आहे. मौनी अमावस्येला दुसरे शाही स्नान होते. गर्दीमुळे पहाटे 2 वाजेच्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना घडली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

चेंगराचेंगत जखमी झालेल्या भाविकांवर कुंभ परिसरात उभारण्यात आलेल्या सेक्टरमधील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. पण या संपूर्ण घटनेने पंचायती आखाड्याचे महामंडलेश्वर प्रेमानंद पुरी श्री निरंजनी यांना धक्का बसला आहे. घटनेने व्यथित झालेल्या प्रेमानंद पुरी श्री निरंजनी यांना रडू कोसळले आहे.

प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. संपूर्ण प्रशासन फक्त आलेल्या व्हीआयपींच्या हुजरेगिरी करण्यात लागलं. या प्रशासनाला कुंभ मेळ्याचे काहीही गांभीर्य नाही. त्यामुळे सर्वच व्यवस्थेकडे दुर्लक्ष केलं. महाकुंभची व्यवस्था ही लष्कराच्या हाती द्या, अशी मागणी सर्व आखाड्यांनी अनेकदा केली होती. लष्कराच्या हाती महाकुंभ मेळ्याचे नियोजन दिले असते तर एवढी मोठी दुर्घटना घडली नसती. खूप दुःख आहे, असे म्हणत महामंडलेश्वर प्रेमानंद पुरी यांना रडू कोसळले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;