‘बजरंगी भाईजान’चा दिग्दर्शक कबीर खान महाकुंभमध्ये करणार पवित्र स्नान; म्हणाला “यात हिंदू-मुस्लीम..”

‘बजरंगी भाईजान’चा दिग्दर्शक कबीर खान महाकुंभमध्ये करणार पवित्र स्नान; म्हणाला “यात हिंदू-मुस्लीम..”

दर बारा वर्षांनी प्रयागराजला पूर्ण कुंभ होत असतो. असेच 12 पूर्णकुंभ म्हणजे दर 144 वर्षांनी एक महाकुंभ येतो. यंदा हाच महाकुंभ मकरसंक्रांती ते महाशिवरात्री या कालावधीत प्रयागराजमध्ये होत आहे. जगभरातील 100 देशांमधून तब्बल 40 कोटी भाविक या महाकुंभमध्ये सहभागी होतील, असं म्हटलं गेलंय. त्यामुळे या संधीचं सोन असंख्य जण करत आहेत. यात बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खानसुद्धा सहभागी झाला आहे. कबीर खान मुस्लीम असूनही तो महाकुंभमध्ये शाही स्नान करण्यासाठी पोहोचला आहे. विमानतळावर पोहोचल्यानंतर पत्रकारांनी त्याची प्रतिक्रिया विचारली. त्यावर त्याने “यात हिंदू-मुस्लीम असं काही नसतं” असं म्हटलंय.

काय म्हणाला कबीर खान?

“मी खूप उत्सुक आहे. 12 वर्षांनंतर एकदा महाकुंभ असतो. आयुष्यात एकदाच अशी संधी मिळते. त्यामुळे मी फार उत्सुक आहे. पुढे खूप गर्दी आहे, असं मी ऐकलंय. पण इथे पोहोचणं मी माझं भाग्य समजतो. पुढील दोन-तीन दिवस मी इथेच राहणार आहे. महाकुंभमध्ये आलोय तर इथं पवित्र स्नान करणारच. या सर्व गोष्टी हिंदू-मुस्लीमच्या नसतात. या आपल्या देशाच्या आणि इथल्या सभ्यतेच्या गोष्टी आहेत. यात हिंदू-मुस्लीम असा भेदभाव नसतो. जर तुम्ही स्वत:ला हिंदुस्तानी मानत असाल तर तुम्ही प्रत्येक गोष्ट केली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

कबीर खानने ‘चंदु चॅम्पियन’, ’83’, ‘बजरंगी भाईजान’, ‘एक था टायगर’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. कबीर खानच नव्हे तर कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी आतापर्यंत महाकुंभमध्ये पवित्र स्नान केलंय. यात अभिनेता अनुपम खेर, मिलिंद सोमण, कोरिओग्राफर रेमो डिसूझा, कॉमेडियन सुनील ग्रोवर यांचाही समावेश आहे. इतकंच नव्हे तर जगप्रसिद्ध ‘कोल्डप्ले’ बँडचा मुख्य गायक ख्रिस मार्टिनसुद्धा गर्लफ्रेंड डकोटा जॉनसनसोबत महाकुंभला पोहोचला आहे. महाकुंभच्या संगममध्ये पवित्र स्नान केल्यास मोक्ष प्राप्त होतो, असं मानलं जातं.

प्रयागराज इथं 13 जानेवारीपासून सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यातील गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर आतापर्यंत 10 कोटी भाविकांनी स्नान केल्याची माहिती गुरूवारी उत्तर प्रदेश सरकारने दिली. देशासह जगभरातून भाविक मोठ्या उत्साहात महाकुंभमध्ये दाखल होऊन त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;