चिनी ‘एआय’चा अमेरिका शेअर बाजारात धमाका; ‘एनवीडिया कॉर्प’चे 600 अब्ज डॉलर स्वाहा

चिनी ‘एआय’चा अमेरिका शेअर बाजारात धमाका; ‘एनवीडिया कॉर्प’चे 600 अब्ज डॉलर स्वाहा

एआय तंत्रज्ञान ताब्यात घेऊन दररोज एक धमाका करायची जगभरात जणू स्पर्धाच लागली आहे. असाच एक ताजा धमाका चीनने केला.  ‘डीपसीक’ या चीनच्या स्टार्टअप कंपनीने स्वस्त असे एआय मॉडेल तयार केलेय. या एआय मॉडेलने अमेरिकेच्या शेअर बाजारात आज खळबळ उडवली. चीनच्या एआय चमत्काराने अमेरिकेची सर्वात आघाडीची टेक कंपनी ‘एनवीडिया कॉर्प’ला जबदस्त हादरा दिला.

‘एनवीडिया कॉर्प’चे 600 अब्ज डॉलर स्वाहा केले. चीनच्या स्वस्त एआय मॉडेलने अमेरिकेची झोप उडाली असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन टेक कंपन्यांना सावध केलंय. चीनच्या एआय स्टार्टअप ‘डीपसीक’ने जगभरात खळबळ उडवली आहे. ‘डीपसीक’मुळे सोमवारी शेअर बाजार खुला होताच ‘एनवीडिया कॉर्प’चे बाजारमूल्य जबरदस्त घसरले. अशा प्रकारे  अमेरिकेतील आघाडीच्या टेक कंपनीला हादरा बसल्याने जगभरातील टेक कंपन्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

काय आहे डीपसीक

डीपसीक हे चिनी एआय मॉडेल आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या चॅटजीपीटी, मेटा, गुगल जेमिनी या जनरेटिव्ह एआय चॅटबॉटच्या तुलनेत अधिक प्रगत असल्याचा दावा केला जातोय. लियांग वेनफेंग या तरुणाने 2023 साली या मॉडेलची निर्मिती केली. लियांग वेनफेंगने चीनच्या हांग्जो शहरात कंपनीची स्थापना करून डीपसीकची निर्मिती करून जगभरातील कंपन्यांमध्ये खळबळ उडवून दिली. अवघ्या दोन महिन्यांत केवळ 60 लाख डॉलर खर्च करून हे मॉडेल तयार करण्यात आलंय. याचा वापर गणित, कोडिंग, नॅचरल लँग्वेज रिजनिंगसह वेगवेगळ्या कामांसाठी केला जाऊ शकतो. अगदी कमी खर्चात चिनी कंपनीने एआय मॉडेलची निर्मिती केल्याने अमेरिकेच्या वर्चस्वाला धक्का बसण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;