हिंदुस्थानात 90 तास कामाची चर्चा; ब्रिटनमध्ये कर्मचाऱ्यांना चार दिवसांचा आठवडा

हिंदुस्थानात 90 तास कामाची चर्चा; ब्रिटनमध्ये कर्मचाऱ्यांना चार दिवसांचा आठवडा

हिंदुस्थानात 90 तास कामाची चर्चा सुरू असताना ब्रिटनमध्ये कर्मचाऱ्यांना आठवडय़ाला तीन दिवसांची सुट्टी घोषित झाली. काही दिवसांपूर्वी एल अँड टी कंपनीचे संचालक एस. एन. सुब्रमण्यम यांनी कर्मचाऱ्यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशीदेखील काम केले पाहिजे, अगदी 90 तास काम केले पाहिजे, असे वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर नव्या चर्चेला तोंड फुटले.

सुब्रमण्यम यांच्या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. ही चर्चा सुरू असतानाच ब्रिटनमधील 200 कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी अशी भेट दिलीय. या कंपन्यांमध्ये पाच हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. चार दिवसांचा कामाचा आठवडा असला तरी कर्मचाऱ्यांचा पगार कमी केला जाणार नाही. फाऊंडेशन कॅम्पेनचे संचालक जोइ राईल म्हणाले, 9 ते 5 या वेळेत आठवडय़ाचे पाच दिवस काम करणे ही पद्धत 100 वर्षांपूर्वी स्वीकारण्यात आली होती. ती आजच्या काळासाठी योग्य नाही. 50 टक्के अधिक मोकळा वेळ, आठवडय़ातून चार दिवस काम केल्याने कर्मचाऱ्यांना आनंदी आणि अधिक परिपूर्ण जीवन जगण्याचे स्वातंत्र्य मिळेल.

ब्रिटनमध्ये याआधी आठवडय़ातून चार दिवस कामाचे ही संकल्पना जाहिरात, विपणन आणि प्रेससंबंधित कंपन्यांनी स्वीकारली आहे. आतापर्यंत एकूण 200 कंपन्यांनी चार दिवसांच्या कामकाजाच्या आठवडय़ाचा नियम लागू केला आहे, ज्यामध्ये लंडनमधील 59 कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे.

ब्रिटनमध्ये कोविड महामारीच्या काळापासून कामाच्या तासामध्ये बदल करण्यात आले. 2022 मध्ये अनेक कंपन्यांनी चार दिवसांचा आठवडा लागू केला. तसेच अनेक कंपन्यांनी हायब्रिड मॉडेलदेखील स्वीकारले आहे. ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, नेदरलॅंड, डेन्मार्कसह काही देशांमध्ये आधीपासूनच कामाचा आठवडा चार दिवसांचा आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;